अहमदनगर : ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ चालकाला दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे़ नियमभंग करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्याने ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी प्रथम खटारा वाहने बदलून नवीन वाहने खरेदी केली आहेत तर काहींनी वाहनांना अद्ययावत करत इतर सुविधांचीही पूर्तता केली आहे़नगर शहरासह शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड या तालुक्यांत ४७ वाहन प्रशिक्षण केंद्र आहेत़ यात नगरमध्ये २१ केंद्र आहेत़ ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन प्रशिक्षण घेणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ जिल्ह्यातील बहुतांशी ड्रायव्हिंग स्कूलचालक पैसे घेऊन प्रशिक्षणार्थींना थातूरमातूर प्रशिक्षण देत असल्याची बाब समोर आली होती़अर्धवट प्रशिक्षित चालक वाहन घेऊन रस्त्यावर उतरले तर अपघात होण्याचा धोका जास्त असतो़ वाहनचालकांसह दुसºयांचा जीवही धोक्यात जाऊ नये, यासाठी पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ड्रायव्हिंग स्कूल तपासणी मोहीम हाती घेऊन सर्वांना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले़ कारवाईच्या भितीने वाहनचालकांनी नियमाप्रमाणे बदल करण्यास प्रारंभ केला आहे़संस्थेसाठी प्रशस्त जागा, क्लास रुम, माहिती फलक, दृकश्राव्य साहित्य, प्रशिक्षणासाठी संस्थेकडे असलेली वाहने अद्ययावत ठेवणे, वाहन प्रशिक्षण देणाºयाचा अनुभव, नोंदवह्या आदी बाबींची पूर्तता करणा-या संस्थांनाच अ श्रेणीचा दर्जा दिला जाणार आहे़प्रशिक्षणार्थींना वाहन चालविण्याचे योग्य प्रशिक्षण मिळावे, बाजारात आलेली अत्याधुनिक वाहने त्यांच्या हातात आली तर त्यांनी ती वाहने योग्य पद्धतीनेच चालवावीत, अपघात टळावे आणि संस्थांना भरलेल्या शुल्काच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने वाहन प्रशिक्षण केंद्र अद्ययावत करण्याचे आदेश दिलेले आहेत़ ज्या चालकांना चाचणीदरम्यान योग्य वाहन चालविता येत नाही त्यांना परवाना दिला जात नाही़ त्यांना पुढील तारिख दिली जाते़ मात्र या प्रशिक्षणार्थींचा वेळ आणि पैसा वाचावा यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी आणि रविवारीही चाचणी घेतली जाते़ -दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीउपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमाप्रमाणे आमच्या प्रशिक्षण केंद्रात सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत़ प्रत्येक शिकाऊ चालकांना अद्ययावत वाहनातून दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते़ यासाठी नवीन वाहन खरेदी केले आहे़ जेवढ्या व्यक्तींना आम्ही प्रशिक्षण देऊ शकतो तितक्याच जणांना प्रवेश दिला जातो़ - राजेंद्र डाके, श्री स्वामी समर्थ ड्रायव्हिंग स्कूल
ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी बदलल्या खटारा गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 1:32 PM