शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

शेतीत येणार आता ड्रोन टेक्नॉलॉजी; शेतक-यांना मिळणार अचूक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 12:06 PM

येत्या काही वर्षात शेतीतील ड्रोनचा वापर वाढला जाईल. त्यातून शेतक-यांना पिकांचा सर्व्हे, पीक नुकसानीची अचूक माहिती शेतक-यांना मिळविता येणार आहे, असे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेंकट मायंदे यांनी मांडले. 

राहुरी  : भारतातील ड्रोन कंपन्यांना कमी खर्चात ड्रोनची निर्मिती करून ते शेतक-यांपर्यंत पोहोच करणे आवश्यक आहे़. येत्या काही वर्षात शेतीतील ड्रोनचा वापर वाढला जाईल. त्यातून शेतक-यांना पिकांचा सर्व्हे, पीक नुकसानीची अचूक माहिती शेतक-यांना मिळविता येणार आहे, असे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेंकट मायंदे यांनी मांडले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कास्ट-कासम या प्रकल्पाच्या वतीने काटेकोर शेतीसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीची मूलतत्त्वे या विषयावर आयोजित आॅनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शनिवारी समारोप झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वेंकट मायंदे बोलत होते. भारतातून तसेच विदेशातून ७०० प्रशिक्षणार्थींनी आॅनलाईन प्रशिक्षण घेतले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. यावेळी संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार तसेच सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे स्वानंद गुधाटे, अजित खर्जुल, शशांका मालगामा, डॉ. सचिन नलावडे आदी आॅनलाईन उपस्थित होते.कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, लॉकडाऊनमुळे प्रत्येक क्षेत्रात अमूलाग्र बदल होणार आहेत. शेतीतील यांत्रिकीकरण वाढणार आहे़ त्याचवेळी शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरही वाढणार आहे. तसेच ड्रोनच्या साहाय्याने विविध आपत्तीमध्ये होणारे पीक नुकसानीचे मूल्यमापन अचूकपणे करून इन्शुरन्सचा फायदा शेतक-यांना करून देता येऊ शकतो, याकडे लक्ष दिले पाहिजे.प्रास्ताविक डॉ. सुनील गोरटीवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गिरीशकुमार भणगे यांनी केले. आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी