शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील पाणीटंचाईवर अखेर तोडगा; पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर टँकर चालकांचा संप मगे
2
“मोदीजी, RSSचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ
3
शिवसेना मी वाढवली, दानवे नंतर आले अन् काड्या...; चंद्रकांत खैरे संतापले, उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार
4
सौदीचा राजदूत बांगलादेशच्या मॉडेलच्या पडला प्रेमात; लग्नाची मागणी घातली अन् संबंध बिघडले, ती हसिना जेलमध्ये...  
5
दत्त जयंतीचा जन्म, समर्थ रामदास स्वामींचे दर्शन; गुरुनिष्ठेचा परम आदर्श श्रीधर स्वामी महाराज
6
रस्त्यावरच साप-कावळ्याचं 'द्वंद्वयुद्ध'! कोण हरलं, कोण जिंकलं? बघा थरारक VIDEO
7
८८ वर्षांच्या पत्नीचा 91 वर्षीय पतीवर अनैतिक संबंधांचा आरोप, रागाच्या भरात पतीनं केला चाकू हल्ला; न्यायालय म्हणालं...
8
पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!
9
कोविड महामारीनंतर भारतात डिझेलच्या मागणीत मोठी घट; काय आहे कारण?
10
लंडनला ड्रामाचं शिक्षण घेतल्याचा हास्यजत्रेत उपयोग झाला का? ईशा डे म्हणाली...
11
"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
भांड्यांवरील काळे डाग फ्रीजमधील छोट्याशा गोष्टीने पटकन होतील गायब, रेस्टॉरंट्सचा सुपर हॅक
13
एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा
14
सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज
15
जुलै महिन्यात मोठा जलप्रलय येणार; जपानी भविष्यवेत्त्याने जगाला हादरवून सोडले, एवढे देश...
16
PF क्लेम, व्हेरिफिकेशन... EPFO चे तीन मोठे नियम बदलले, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम
17
हैदराबादची टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये आग, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
18
Terence Lewis : "मी लिव्ह इनमध्ये राहिलोय, खूश राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, आयुष्यात कधीच..."
19
'ही' दिग्गज कंपनी पगारवाढ करणार नाही, तरीही ४२ हजार ट्रेनींची होणार भरती; १ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रमोशन
20
"ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय

शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील ३० ते ४० गावांमध्ये आकाशात ड्रोनच्या घिरट्या

By सुदाम देशमुख | Updated: August 22, 2024 23:31 IST

नागरिक भयभीत : पोलिसांनी गस्त वाढवली

अहमदनगर: शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील ३० ते ४०  गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात फिरत असल्याचे नागरिकांनी गुरुवारी रात्री पाहिले. ड्रोन सदृश्य चमकणारी ही वस्तू आकाशात घिरट्या  घालत असल्याने नागरिक भयभीत  झाले. 

हा नेमका प्रकार काय आहे याची पोलीसही चौकशी करत आहेत. मात्र त्यांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समजली नाही.  गत महिन्यामध्ये पारनेर तालुक्यातील निघोज परिसरामध्येही असेच ड्रोन फिरत होते. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती.  मात्र याबाबत पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.

 दरम्यान गुरुवारी रात्री पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील ३० ते ४० गावांमध्ये असे ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले. आकाशात फिरणारे  तीन ते चार ड्रोन असून ते  एका एखाद्या टॉवरच्या  उंचीइतके आकाशात आहेत. ते आकाशात चमकत आहेत. ड्रोनसदृश्य वस्तू दिसल्यानंतर नागरिक घराबाहेर आले.  टेरेसवर थांबले. त्यांनी एकमेकांना मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांच्या गावांमध्येही असेच ड्रोन ग्रामस्थांना आढळल्याचे समजले. अशाप्रकारे 30 ते 40 गावांमध्ये असे ड्रोन दिसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.ड्रोन सारखी चमकणारी वस्तू आहे. हे ड्रोन आहेत की आणखी काय काय आहे? याबाबत ग्रामस्थ किंवा पोलिस अधिकाऱ्यांकडून  कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत प्रशासन पातळीवर संपर्क सुरू असून नेमका काय प्रकार आहे याची चौकशी केली जात आहे.

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांना दूरध्वनी करून  रात्रभर गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही सतर्क रहावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.