अहमदनगर : जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने खरीप व रब्बी पिके वाया गेली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यातील १२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी केली आहे.जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगांव, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपू र जिल्ह्यातील खरिप पिकांपाठोपाठ रब्बी पिकांची पेरणीच झालेली नाही. थोडीफार पेरणी झाली होती, ती सुध्दा पिके जळी लागली आहेत. जनावरांच्या चा-यांचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडत आहेत. शेतक-यांच्या पुढे फळबागा जगविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. फळबागांना टँकरने पाणी देण्याचे काम चालू असून टँकरमध्ये नेमके कुठून पाणी आणायचे हा सुध्दा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे. काही तालुक्यांमध्ये अतिअल्प पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. या पार्श्वभुमीवर शासनाने १२ तालुक्यांमध्ये त्वरीत दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील १२ तालुक्यात दुष्काळ जाहिर करावा : खासदार दिलीप गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 5:42 PM