शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

एमआयडीसीच्या पाण्यावर डाका

By admin | Published: March 02, 2015 1:23 PM

वाटेत एमआयडीसीच्या पाण्यावर शेतकरी, हॉटेल व्यावसायिक 'डल्ला'मारत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या स्टिंगमध्ये उघड झाले आहे.

ज्ञानेश दुधाडे/नागेश सोनवणे ■ अहमदनगर

मुळा धरणावरून एमआयडीसी, नगर शहराला पाणी पुरवठा करणारी महानगरपालिकेची आणि बुर्‍हाणनगर पाणी योजनेची पाईपलाईन नगरला येते. साधारणत: ३0 ते ३५ किमीचे अंतर कापून या लाईनमधून एमआयडीसी आणि नगरला पाणी पुरवठा होतो. मात्र, वाटेत एमआयडीसीच्या पाण्यावर शेतकरी, हॉटेल व्यावसायिक 'डल्ला'मारत असल्याचे 'लोकमत'ने शनिवारी केलेल्या स्टिंगमध्ये उघड झाले आहे. सरकारी पाण्याचा वापर करुन ही पाईपलाईन असणार्‍या भागातील शेती बहरली असून हॉटेल व्यावसायिकांची चांदी झाली आहे.

'लोकमत' ने शनिवारी या पाईपलाईनच्या मुळा धरणापासून केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक चित्र समोर आले आहे. साधारण मुळा धरण फाटा ते बाभुळगाव या तीन ते चार किमी अंतरात अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागलेली आहे. या ठिकाणी पाईपलाईनला छिद्र पाडून त्यातून रात्रंदिवस बाहेर पडणारे पाणी चक्क शेतात तीन इंची, पाच इंची पाईपव्दारे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.या पाण्यावर ऊस, गव्हू, कांदा, फळबागा, चारा पिके, घास जोमात वाढलेला दिसून आला. या पाईपलाईनच्या जीवावर बाभुळगाव परिसरात उन्हाळ्यात या ठिकाणी दुष्काळ दिसणार नाही, याची खात्री झाली. या परिसरात पाईपलाईन शेजारी विहिरी खोदण्यात आलेल्या असून ओढय़ा नाल्यात पाणी लिकेज करून सोडून देण्यात आले आहे. त्यातून पुन्हा पाणी उचलून शेतीसाठी वापर होत आहे.मुळा धरण फाटा ते बाभुळगाव आणि बाभुळगाव ते नांदगाव या ठिकाणी असंख्य ठिकाणी पाईपलाईनला छिद्रे पाडण्यात आलेली आहेत. तर अनेक ठिकाणी एअरवॉलमध्ये दगड, लाकडी खुंट्या टाकण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून अतिरिक्त पाणी पाईपलाईन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे या लाईनमधून दररोज हजारो लीटर पाण्याची चोरी होत आहे. याकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शेतीसोबत अनेक ठिकाणी या पाईपलाईनच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि धुणीभांडी करण्यासाठी होत असल्याचे यावेळी दिसून आले. शेतकरी आणि लाईन परिसरात राहणारे नागरिक सर्रासपणे या पाण्याचा वापर करत असल्याचे यावेळी दिसून आले. नांदगाव ते शिंगवे, देहरे टोल नाक्याच्या अलीकडे साधारण एक कि.मी.वर ही लाईन नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला येते. येथून नगरपर्यंत ही लाईन रस्त्याच्याकडेने आहे. पाईपलाईन शेजारी असणार्‍या लहान चहाच्या टपरीपासून ते मोठय़ा ढाब्यापर्यंत सर्वत्र या लाईनच्या पाण्यावर डल्ला मारण्यात येत आहे. लाईनचा ऐअर वॉल अथवा लोखंडी पाईपला छिद्र पाडून त्याव्दारे अहोरात्र या पाण्याचा वापर होत आहे. देहरे टोलनाक्याशेजारी असणार्‍या कर्मचार्‍यांची निवासस्थाने आणि टोलनाक्याच्या ऑफीसजवळ असणार्‍या एमआयडीसी पाईपलाईनच्या वॉलवर परिसरातील सर्वांची तहान भागविली जात आहे. याबाबत टोल नाका व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता, आमच्यासाठी बोअरवेल आहे. त्याचे पाणी आम्ही वापरतो. मात्र, काही कर्मचारी बोअरवेलचे पाणी वापरासाठी तर पाईपलाईनचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याची कबुली दिली. त्यापुढे हॉटेल, दूध संकलन केंद्र या ठिकाणी पाईपलाईनच्या पाण्याचा वापर करत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)

■ नांदगाव ते एमआयडीसी दरम्यान ही लाईन नगर-मनमाड रस्त्याच्याकडे आहे. वर्षभरात अनेक वेळा ही पाईपलाईन फुटलेली आहे. यात हजारो लीटर पाणी वाया गेल्याचे सर्वश्रुत आहे. पाईपलाईनमधील हवेच्या दबावाने कधीतरी लाईन फुटली असेल, मात्र बहुतांश वेळा लाईनला छिद्र पाडून पाणी बाहेर काढण्याच्या नादात मोठे लिके ज झालेले असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

सर्वच एअरव्हॉल्वमधून रात्रं-दिवस हजारो लीटर वाया जाणारे पाणी. ४0 वर्षांपूवीची पाईपलाईन■ एमआयडीसीची ही पाईपलाईन १९७५ ला टाकण्यात आलेली आहे. या लाईनचे आयुष्य ४0 वर्षाचे झालेले आहे. लाईनमधून दररोज २५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा करण्यात येतो. प्रत्यक्षात एमआयडीसीपर्यंत ११ ते १९ दशदक्ष घनमीटर पाणी पोहोचते. साधारण २४ किमीचे अंतर पार करताना ४0 टक्के पाणी वाया अथवा चोरीस जात आहे. नांदगावजवळ एमआयडीसीच्या पाईपलाईनला छिद्र पाडून सुरु असलेली पाणीचोरी विळदजवळील ढाब्यावर सुरु असलेली पाणीचोरी एअरव्हाल्वलाच पाईप जोडून विहिरीत पाणी सोडण्याची केलेली व्यवस्था

■ एमआयडीसीच्या पाईपलाईन यापूर्वी अनेक वेळा शेतकर्‍यांकडून फोडण्यात आल्या असल्याचे केलेल्या पाहणीत आढळून आले. अनेक ठिकाणी या भल्या मोठय़ा पाईपलाईनला थिगळ होते. काही ठिकाणी तर नव्याने लाईन फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याच्या खूणा दिसून आल्या. विशेष म्हणजे हा प्रकार मुळा धरण फाटा ते नांदगाव दरम्यान आडबाजूला शेतात दिसून आला. मुळा धरणातून नगर शहराकडे साधरणत: चार योजनांची पाईपलाईन येते. यासह काही खासगी शेतकर्‍यांच्याही पाईपलाईन आहेत. मात्र, एमआयडीसीची लाईनही आकाराने मोठी आणि अहोरात्र सुरू राहणारी आहे. शिवाय ही फोडल्यास तातडीने त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे मनपाची लाईनही भूमिगत असून बुर्‍हाणनगर पाणी योजनेची लाईन आकाराने छोटी तिही भूमिगत आहे.