अहमदनगर : सावेडीतील वैदुवाडी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर २० आॅगस्टपर्यंत सील केला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शनिवारी (८आॅगस्ट) आदेश काढून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
वैदुवाडी रोड, शुभंकरोती बंगला, प्रियदर्शनी कॉलनी, विजय आर्ट, धनंजय कार केअर, लगड यांचे घर, अंबिका स्टील, गुरूकृपाधाम कमान, रेवती नर्सिंग होम, हॉटेल रामा कॉर्नर ते शुभंकरोती बंगला हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
सिद्धीविनायक कॉलनी, गणेश कॉलनी, तुळजा भवानी मंदिर, पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक, लोकमान्यनगर, बालाजी कमान परिसरस, श्रेयस कॉलनी, कुष्ठधाम रोड, गुरूकृपा कॉलनी, वैभव कॉलनी व रेणावीकर शाळा परिसर बफर क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे.
वैदुवाडी परिसरात अत्यावश्यक सेवा महापालिका प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहे. परिसरात रहदारीसाठी आणि जीवनाश्यवक सेवा पुरविण्यासाठी शुभंकरोती बंगला समोरील वैदुवाडी रोड खुला राहिल. या परिसरातील नागरिकांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.