शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भंडारदरा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 6:01 PM

नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा

हेमंत आवारीअकोले : नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमध्ये जलाशयाभोवती पर्यटकांच्या निवासासाठी कापडी ‘तंबू’ सज्ज झाले आहेत. नाताळानिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसर पर्यटकांनी फुलला आहे. गतवर्षी यावेळी भंडारदरा धरण ९८ टक्के भरलेले होते. यंदा मात्र धरणात केवळ ४२ टक्के म्हणजे ४ हजार ७०५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून पर्यटकांचा ओघ बऱ्यापैकी आहे.‘तंबू’ हे यावर्षीचे खास आकर्षण आहे. भंडारदरा धरणाची पाणी पातळी खोल गेली असून त्याचा परिणाम ‘बोटींग’ व्यवसायावर झाला आहे. तर जलसंपदा पाटबंधारे विभागाने धरण पात्रात टेंट (तंबू) लावू नये वा तेथे घाण कचरा होईल, असे कुणी व्यवसाय करू नये यासाठी तंबी दिली आहे. भंडारदरा जलाशयाभोवती ४५ किलोमीटरचा रिंगरोड असून या परिसरात धरणाच्या काठावर आपआपल्या सोयीनुसार आदिवासी युवकांनी पर्यटकांच्या निवासासाठी कापडी तंबू उभारले आहेत. भंडारदरा शेंडी येथील सर्व रिसोर्ट, हॉटेल व शासकीय विश्रामगृहे गर्दीने ओसंडतात. मुंबई-नाशिक भागातील पर्यटक तुलनेने जास्त येतात. एक दिवसाच्या कौटुंबिक सहलीपण मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावताना दिसतात व नौकाविहाराचा आनंद घेतात. २९ व ३० डिसेंबरला शनिवार, रविवार असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे.धरणाच्या कडेला तंबू लावून व्यवसाय करणारांना घाण न करण्याची तंबी दिली आहे. गतवर्षी धरण काठोकाठ भरलेले होते. यंदा ४२ टक्के पाणी आज मितीस आहे. पाणी कमी असले तरी पर्यटकांचा ओघ कमी झालेला नाही. -किरण देशमुख, कार्यकारी अभियंता

भंडारदरा धरणाची पाणी पातळी खोल गेल्याने यंदा नाताळाची गर्दी थोडी कमी दिसते. मात्र शनिवारी, रविवारी गर्दी वाढेल. पर्यटक तंबूला पसंती देतात. व्यावसायिक, पर्यटकांनी पर्यावरणास हानी पोहचवू नये अन्यथा कारवाई केली जाईल. -डी. डी. पडवळ,वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा

आॅनलाईन बुकिंगपण असते. सेवा देता येईल इतकेच तंबू लावतो. शक्यतो कुटुंबवत्सल पर्यटकांना प्राधान्य देतो. आर्थिक कुवत पाहून पैसे घेतो. शौचालयाच्या वापरासाठी पर्यटकांना सक्ती आहे़ बोटींग वाकी धरणावर असते. नाईट सफारी असते. -रघुनाथ बो-हाडे,वाकी, बेस कॅम्प

तंबूमुळे पर्यटकांची संख्या वाढलीय़ मात्र रिसोर्ट-हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम झाला नाही.पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी सर्वच व्यावसायिक घेतात. पर्यटकांनीही स्वत:ची काळजी घ्यावी. बेधुंद होऊन निसर्गाला कवेत घेण्याचा प्रयत्न करू नये.-अमित भांगरे, हॉटेल व्यावसायिक

पर्यटकांसाठी स्थानिक युवकांनी वन्यजीव व आदिवासी विभागाच्या मदतीने कापडी तंबूंमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे. मुरशेत, पांजरे-उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल येथील शेकडो आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुमारे प्रति व्यक्ती बाराशे रूपयांपर्यंत एक दिवसाचा खर्च पर्यटकांकडून घेतला जातो. चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण, शेकोटी, बोट फेरी अशा सुविधा दिल्या जातात.