शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

दुष्काळ मुक्तीसाठी गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:51 AM

निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला.

अहमदनगर : निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला. देहरे , विळद, वडगाव गुप्ता अशा सखल भागातील गावांनाही या जलसंधारणाचा नैसर्गिक परिस्थितीमुळे लाभ होणार आहे.निंबळक येथील तलावाजवळ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून या लढ्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आपले आजोळ असलेल्या निंबळक आणि इसळक गावांच्या पंचक्रोशीला पाणीदार करण्यासाठी पहिली मदत म्हणून एक महिन्याचे १५ हजार रुपयांचे निवृत्तीवेतन अण्णांनी दिले. या उदघाटन सोहळ्यात आनंदवन प्रगती सहयोग उपक्रमाचे संयोजक कौस्तुभ आमटे , भारतीय जैन संघटनेचे नगर जिल्हा समन्वयक आदेश चंगेडिया, आमी संघटनेचे दिलीप अकोलकर , दौलतराव शिंदे, मिलिंद कुलकर्णी, पाणी फाउंडेशन उपक्रमाचे नगर जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड. श्याम असावा, तुलसीराम पालीवाल आदी उपस्थित होते.यावेळी अण्णा हजारे म्हणाले, उशिराने का होईना, परंतु लोकांना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी आपणच रक्त आणि घाम गाळायचा आहे, याची जाणीव झालेली आहे. जाती-धर्म- राजकीय पक्षांचे भेदाभेद गाडून, जी गावे एकजुटीने पाणी, शेती ,माती आणि संस्कृती यांचे संवर्धन करतील त्यांनाच भविष्य राहील. पाणी ही संपूर्ण देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचा समान अधिकार सर्व नागरिकांना मिळाला पाहिजे. तसेच पाण्याचा वापर करण्याबाबत तारतम्य आणि काटकसर अनुसरण्याची भविष्यात गरज आहे.अन्यथा पाणीदार गावे पुन्हा दुष्काळी होण्याचा धोका आहे, असेही अण्णा म्हणाले.पोपटराव पवार म्हणाले, मोठ्या धरणांनी मोठ्या महानगरांचे पिण्याच्या पाण्याचे आणि औद्योगिक गरजांचे प्रश्न सोडविले आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी क्षेत्र आणि बेसाल्ट खडकाच्या जमिनीत नुसते काबाडकष्ट न करता तंत्रशुद्ध पद्धतीने जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा विचार न करता नुसतेच खुदाई केल्याने आहे ते पाणी दुसरीकडे जाते असे अनुभव आहेत.श्रीमंत लोक अधिकाधिक पाण्याचा उपसा करून स्वत:चे उखळ पांढरे करतात. त्यामुळे देशात आणि ग्रामीण भागात आर्थिक विषमता निर्माण होते. अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी आणि विस्थापित होतो.पाणी वापराबाबत समन्यायी दृष्टिकोन आणि आठमाही शेतीचा आग्रह धरणे गरजेचे आहे..

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर