संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव न मिळाल्याने तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी रमेश शिवराम हासे यांनी बाजार समितीच्या बाहेर लोकांना कांद्याचे मोफत वाटप केले.कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात.यंदा पाऊस कमी झाल्याने शेतक-यांनी टँकरद्वारे विकत पाणी घेऊन कांदा पिकवला. यासाठी मोठा खर्च आला. मात्र, कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. गुरुवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला चार रुपये किलो तर उर्वरित कांद्याला केवळ एक रुपये चाळीस पैसे इतका भाव मिळाल्याने हासे यांनी बाजार समितीच्या बाहेर नागरिकांना कांद्याचे मोफत वाटप केले. कांदा पिकविण्यासाठी केलेला खर्चही न मिळाल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
कांद्याला भाव न मिळाल्याने शेतक-याचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:27 AM