अहमदनगर : गेल्या २० दिवसांपासून येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीची कामे आॅनलाईन प्रक्रियेतील बिघाडामुळे ठप्प झाली असून यात पक्षकारांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे या गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी येथील वकिलांनी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.नागरिकांना आॅनलाईन सुुविधा देण्याच्या नावाखाली लॅण्ड रेकॉर्ड नोंदी नवीन प्रणालीमध्ये संलग्न करण्याच्या उद्देशाने जी प्रणाली अंमलात आणली जात आहे, त्यात नागरिकांना तलाठी कार्यालयातून प्राप्त झालेले सात-बारा उताºयातील नोंदी व दुय्यम निबंधक कार्यालय प्रणालीतील नोंदी यात तफावत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दस्तांना टोकन पडत नाही.परिणामी दस्ताची नोंदणीच होत नाही. एखाद्या प्रकरणात जरी दस्तांना टोकन पडले तरी अनेकदा आॅनलाईन लिंक बंद असते किंवा त्यास वेग नसतो, त्यामुळे दस्ताची नोंदणी रेंगाळते. त्यामुळे पक्षकारांचा पूर्ण दिवस वाया जातो. त्यामुळे या गैरसोयी तातडीने दूर कराव्यात अथवा दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पक्षकाराची राहण्याची, भोजनाची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी उपरोधिक मागणी वकिलांनी केली आहे.निवेदनावर अॅड. शाम आसावा, दीपक धीवर, अमोल डोंगरे, व्ही. एस. सांगळे, संदीप भोगाडे, प्रणव धर्र्माधिकारी, संदीप जावळे, पल्लवी शिंदे, एम. एम. बारगळ, गौरव भोसले, विश्वास पुंड, नरहरी खरात, पुष्पा रोहकले, संजय गायकवाड, एस. एस. केकाण, अमित झरकर आदींनी केली आहे.
आॅनलाईन बिघाडामुळे खरेदी-विक्री दस्तावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 1:07 PM