शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

Ahmednagar: महापालिकेच्या उदासिनतेमुळे शौचालयांसाठी आलेला ४ कोटींचा निधी परत गेला

By अरुण वाघमोडे | Published: October 17, 2023 5:31 PM

Ahmednagar: महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- अरुण वाघमोडे अहमदनगर - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत मनपात मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती गणेश कवडे यांच्यासह सभागृह नेते विनित पाऊलबुधे यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.

सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेवक मुद्दसर शेख, प्रदिप परदेशी, नज्जू पैलवान, पल्लवी जाधव, सुनीता कोतकर, मंगल लोखंडे आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानातंर्गत महापालिकेला सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी आलेला ४ कोटींचा निधी शासनाकडे परत कसा गेला, याला जबाबदार कोण तसेच याबाबत आपण काय कारवाई केली. असा प्रश्न नगरसेवक पाऊलबुधे यांनी उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे यांनी निधी खर्च करण्यासाठी वेळ कमी होता व जागा निश्चित झाली नाही. तसेच आधी घनकचरा विभाग दुसऱ्या अधिकाऱ्याकडे होता. असे उत्तर दिले. यावर सभापती कवडे यांच्यासह पाऊबुले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासनाकडून आलेल्या निधीबाबत अधिकारी पदाधिकाऱ्यांना माहिती देत नाहीत. तसेच निधीचा योग्य व वेळेत विनियोग करत नाहीत. त्यामुळेच हा निधी परत गेला. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा, अशी मागणी पाऊलबुधे यांनी केली. यावर सभापती कवडे यांनी आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर