घारगाव : संगमनेर तालुक्याच्या घारगाव परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान जोरदार हादरा बसला. घारगाव, माहुली परिसरात भूगभार्तील हालचालींमुळे बसणा-या भूकंपसदृश धक्क्यांमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.मागील वर्षी बोटा परिसराच्या माळवाडी, आंबी दुमाला, कुरकुटवाडी, आळेखिंड या परिसरातील गावांना या धक्क्यांची तीव्रता अधिक जाणवली होती. याशिवाय शेजारील जुन्नर तालुक्यातील आळे, संतवाडी, आळेफाटा या ठिकाणीही धक्के जाणवले होते. भूगभार्तील या सर्व हालचालींची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर झाली होती. त्यांच्या अहवालानुसारत्याची तीव्रता २.३ रिक्टर स्केल पासून २.८ रिश्टर स्केल पर्यंत होती. घारगाव परिसरातही आता भूकंपसदृश धक्के जाणवू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.