पाचेगाव : गणेश भक्तांना गणेश उत्सवाची आस लागलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी विद्यार्थ्यांच्या सहभागाने इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
सरपंच संगीता कांबळे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
शाळेच्या दिवंगत शिक्षिका सुरेखा जाधव (लुटे) यांची कन्या मूर्तीकलाकार गायत्री जाधव यांच्या सहकार्याने तसेच कोविड नियमांचे पालन करीत या इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गणपती बनविण्यासाठी शाडूचा प्रामुख्याने वापर करण्यात आला. यावेळी कलाकार गायत्री जाधव यांनी शाडूचा गणपती शाळेला सप्रेम भेट दिला.
चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक मूर्ती बनविल्या होत्या.
कार्यशाळेला शिक्षक ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी कांबळे, स्वाध्याय परिवारातील तुकाराम जाधव, गोरख राशिनकर,
छबूराव राक्षे आदींसह प्रभारी मुख्याध्यापक जालिंदर दिवटे, किशोर बनकर, प्रदीप तांबे, किशोर पवार, वैशाली पवार, मीना गायकवाड, सुहास धनेधर, धम्मपाल घनबहादूर आदी उपस्थित होते.
---
१० पाचेगाव