सेवा वस्तीतील बालकांना शिक्षणाची गोडी लागावी. अत्याधुनिक शिक्षण साधनांद्वारे मुलांना व्यवस्थित अभ्यास करता यावा या हेतूने नवनवीन उपक्रम राबवण्याचा संकल्प बालभवन कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे.
सेवा वस्तीतील मागासलेल्या व शिक्षणाची जाणीव नसणाऱ्या शेवटच्या घटकातील बालकापर्यंत पोहचून त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून यशाची नवी दिशा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्याची संधी मिळाल्याचे डॉ. महेश मुळे यांनी आपल्या भाषणात केले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर, बालभवन संचालक संजय बंदिष्टी, हनिफ शेख, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालभवन संचालक संजय बंदिष्टी यांनी केले. निर्जला चव्हाण, हेमा धारवाडकर, तनुजा नेटके, सुनीता सोळस्कर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालभवन प्रकल्प व्यवस्थापिका शबाना शेख, उषा खोल्लम, राजू पांढरे, मेघा वरखेडकर यांनी परिश्रम घेतले.