स्कूलच्या संचालिका मनाली अमित कोल्हे यांनी स्कूलच्या स्थापनेपासून शैक्षणिक क्षेत्रात आणलेल्या आमूलाग्र बदलांबाबत व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीबाबतच्या प्रयत्नांबद्दल त्यांना एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ दि ईअर पुरस्काराने सन्मानित केले, अशी माहिती स्कूलच्या वतीने देण्यात आली आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षण देऊन त्यांनी येणाऱ्या विश्वव्यापक आव्हानांना सामोरे जाऊन यशस्वी जीवन जगावे, या हेतूने २०१२ मध्ये संजीवनी अकॅडमीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून स्कूलच्या संचालिका मनाली कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नावीन्यपूर्ण व सृजनशील उपक्रमांमुळे संजीवनी अकॅडमीने देश व राज्य पातळीवर अनेक कीर्तीमान स्थापित केले.
एज्युकेशनल एक्सलन्स या पुरस्कारासाठी देशातील सुमारे ३ हजार ५०० शाळांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनी अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच कोरोना महामारीच्या काळात देण्यात आलेले सर्वोत्तम ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे दिलेले शिक्षण, याबाबतचे सादरीकरण नॅशनल स्कूल अवाॅर्ड या संस्थेकडे सादर केले. या संस्थेने सर्व बाबींची शहानिशा करून संजीवनी अकॅडमीला ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ या पुरस्काराने सन्मानित केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या पुस्काराबद्धल समाधान व्यक्त करून सर्वांचेच कौतुक केले आहे.
150921\manali kolhe.jpg
फोटो१५ : मनाली कोल्हे – कोपरगाव