लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वराज्य कामगार संघटनेचा लढा सुरू असून कामगार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास कामगारांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी येथे केले. स्वराज्य कामगार संघटनेची आठवी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी ते बोलत होते.
या सभेत योगेश गलांडे यांच्या अध्यक्षपदाचा व आकाश दंडवते यांच्या सचिवपदाचा ठराव आदिनाथ शिरसाठ यांनी मांडला. या ठरावास प्रदीप दहातोंडे यांनी अनुमोदन दिले. फेरनिवड झाल्यानंतर गलांडे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी स्वप्निल खराडे, सुनील देवकुळे, दीपक परभणे, सागर बोरुडे, सोमनाथ शिंदे, सागर कराळे, भानुदास कुरकुरे, नीलेश हसनाळे, विजय काळे, संतोष शेवाळे, विजय गावडे, आदिनाथ शिरसाठ, शरद थोरात, भाऊ जाधव, सतीश गायकवाड, अमोल उगले, वसीम शेख, बिभीषण पांडुळे,पोपट जगताप आदी उपस्थित होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत शासनदरबारी व कामगारांच्या न्यायासाठी न्यायालयात दाद मागण्यासाठी विचारविनिमय करणे, एक्साईड इंडस्ट्रिअल लिमिटेड या संस्थेतील कामगारांना कंपनीतील सेवेत सामावून घेण्याबाबत व त्यांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत विचारविनिमय करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष योगेश गलांडे व सचिव आकाश दंडवते कोविड- १९ च्या काळात कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांना मार्च व एप्रिल महिन्याचे पूर्ण वेतन मिळवून दिल्याबद्दल सभासदांनी त्यांचे आभार मानले.
योगेश गलांडे म्हणाले, कामगार कायद्याच्या वापरामुळे कामगारांना न्याय मिळतो. कामगार व उद्योजक
यांच्यामध्ये समन्वय ठेवल्यामुळे उद्योगात प्रगती होते.
..
सूचना फोटो स्वराज्य नावाने आहे.
फोटो : स्वराज्य कामगार संघटनेच्या आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना अध्यक्ष योगेश गलांडे. समवेत आकाश दंडवते व कामगार, सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.