आरोग्य केंद्राच्या फरशी दुरुस्तीच्या कामासाठी १० लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. त्यातील तीन लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून प्रत्यक्ष कामास मंगळवारी प्रारंभ झाला. यावेळी सरपंच चिडे बोलत होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहेल शेख, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुदाम आसने, भास्कर आसने, जयदीप आसने, सतीश आसने, दिलीप हुरुळे आदी उपस्थित होते.
सरपंच चिडे म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मुठेवाडगाव, खाणापूर, भामाठाण, माळवाडगाव येथील नागरिकांना आरोग्यसेवा मिळत आहे. गरीब रुग्णांसाठी हे मोठे आधार केंद्र ठरले आहे. गावकरी व परिसरातील नागरिकांनीही आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोनाकाळात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. डॉ. सुहेल शेख यांनी प्रास्तविकातून आरोग्य केंद्रातील अडचणींची माहिती देऊन त्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.
याप्रसंगी किसनराव आसने, माजी सरपंच शेषराव खाजेकर, बाळासाहेब आसने, सदस्य अनिल आसने, संजय आसने, विठ्ठल आसने, डॉ. आसीम सय्यद आदी उपस्थित होते.
--------