शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

नगरमध्ये आठ बहुराष्ट्रीय कंपन्या लवकरच : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:39 AM

पहिल्या टप्प्यात आठ कंपन्या येथील एमआयडीसीतील आयटीपार्क मध्ये सुरू होणार आहेत़

अहमदनगर : बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, पहिल्या टप्प्यात आठ कंपन्या येथील एमआयडीसीतील आयटीपार्क मध्ये सुरू होणार आहेत़ या कंपन्यांकडून लवकरच जॉब फेअरचे आयोजन करण्यात येईल़ नगर शहरासह जिल्ह्यातील सुमारे २५० ते ३०० तरुणांना या कंपन्यांमध्ये रोजगार मिळेल, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली़येथील नागापूर औद्योगिक वसाहतीत आयटीपार्क उभारण्यात आला आहे़ परंतु,आयटी कंपन्या नगरमध्ये येत नव्हत्या़ त्यामुळे आयटी पार्क बंद होता़ तो सुरू करण्यासाठी काही आयटी कंपन्यांशी चर्चा सुरू होती़ या कंपन्यांनी नगरमध्ये येण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे, असे जगताप म्हणाले़पहिल्या टप्प्यात आठ बहुराष्ट्रीय कंपन्या नगरमध्ये येत आहेत़ अन्य नामांकित कंपन्यांशी चर्चा सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी कंपन्या येतील़ पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या कार्यरत आहेत़ पुण्याच्या धर्तीवर नगर आयटी हब होईल़ त्यासाठी यापुढील काळातही प्रयत्न केले जातील़ तरुणांचा ओढा आयटीकडे आहे़ आयटी क्षेत्रात मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण होत आहे़आयटी कंपन्या नगरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले़ आयटी कंपन्यांशी चर्चा केली़ त्यांनी नगर येथील आयटीपार्कची पाहणी केली़ त्यांना आवश्यक असलेल्या सुविधाही उपलब्ध आहेत़ त्यामुळे ते नगरला येण्यास तयार झाले़ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपन्यांचे प्रतिनिधी नगरमध्ये येऊन गेले़पुढील काही दिवसांत रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येणार आहे़ भरती प्रक्रिया पूर्ण करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे़ आयटी कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार सुविधा पुरविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार असून,आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करून बड्या कंपन्यांना येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जगताप म्हणाले़क्लस्टरला कर्जपुरवठा करण्यासाठी पाठपुरावाएमआयडीसीत क्लस्टर उभारण्यात आले आहे़ त्याचा उद्योजकांना मोठा फायदा होत आहे़ परंतु, क्लस्टरसाठी निधी अपुरा पडत आहे़ त्यासाठी सरकारने कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जगताप म्हणाले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगतापahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय