शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ने हटवले आठशे टँकर!

By चंद्रकांत शेळके | Published: February 13, 2018 3:28 PM

दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला. आतापर्यंत या योजनेतून अर्धा जिल्हा (५४७ गावे) पाणीदार झाला असून दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुरू असलेले ८०० टँकर आज अक्षरश: शून्य झाले आहेत. यावरूनच या योजनेची यशस्वी घोडदौड लक्षात यावी.राज्याच्या सतत होणा-या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. त्यातून २०१९पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार जरी मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी त्याला सरकारी अधिकाºयांचे उत्तम नियोजन व लोकसहभागाची जोड मिळाल्याने ही योजना दोन वर्षांतच कमालीची यशस्वी ठरली.सन २०१४-१५पर्यंत भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झाली होती. त्यामुळे प्राधान्याने अशी गावे निवडून या योजनेचे काम सुरू झाले. पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे निर्माण होईल, अशी शाश्वती अधिका-यांनी शेतक-यांना दिल्याने लोकसहभाग आपोआपच वाढला.पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे, भूजल अधिनियमाची अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्त्रोतांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतांतील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती, तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे असा हा जंबो कार्यक्रम एका मिशनअंतर्गत सुरू झाला.राज्यासह नगर जिल्ह्यातही सन २०१५-१६पासून या अभियानाने गती घेतली. कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन, जलसंपदा, जिल्हा परिषदेकडील कृषी व लघुसिंचन, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, स्वच्छता अशा जिल्हास्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय राखून हे अभियान राबविण्यात आले.

दोन वर्षांची पेरणी, तिस-या वर्षी फळ

जलयुक्त शिवार अंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात नगर जिल्ह्यातील २७९ गावांत तब्बल १४ हजार ६४८ कामे पूर्ण झाली. त्यासाठी शासनाने २०६ कोटींचा खर्च केला. हे वर्ष कमालीचे यशस्वी ठरल्याने पुढील २०१६-१७ वर्षात शासकीय अधिका-यांसह ग्रामस्थांचाही विश्वास दुणावला व पुन्हा २६८ गावांत ८३३४ कामे पूर्ण झाली. त्यासाठी सुमारे दीडशे कोटींचा खर्च झाला. त्यातील काही गावांतील कामे अजूनही सुरू आहेत. दरम्यान ही कामे सुरू असताना किंवा त्याआधी दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा ठरलेला होता. २०१६मध्ये जिल्ह्यात तब्बल ८२६ टँकरद्वारे ५१६ गावे व तीन हजार वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू होता. शासनाने जलयुक्तची पेरणी केलेली होती, अवधी होता तो केवळ वरूणराजाच्या हजेरीचा. नशिबाने ही अपेक्षाही २०१७च्या पावसाळ्यात पूर्ण झाली. त्या वर्षी रेकॉर्डबे्रक पाऊस झाल्याने जलयुक्तच्या या ५४७ गावांचे शिवार फुलले. आजमितीस सर्व गावांत पाणी असून कोठेही टँकर सुरू नाही.

टंचाई खर्चात बचत

सन २०१४-१५मध्ये ३९ कोटी, तर २०१५-१६मध्ये ७० कोटी खर्चाचा टंचाई आढावा शासनाने तयार केला. त्यावर तो खर्चही झाला. परंतु पुढे जलयुक्तही कामे झाल्याने यंदाचा टंचाई उपाययोजनांचा खर्च केवळ ६ कोटी ८७ लाखांचा आहे.पाणीटंचाई आढावावर्ष       टँकर    गावे२०१२   २८९    २७२२०१३   ७०७    ५००२०१४   ३६९    २८५२०१५   ५२१    ३७७२०१६   ८२६    ५१६२०१७   ११४    ७०२०१८    ०        ०

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJalyukt Shivarजलयुक्त शिवार