अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. दोन दिवसात ८ हजार ४१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर दोन दिवसात ७ हजार ४९२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही दिवसांच्या अहवालात ७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकीकडे चाचण्यांची संख्या वाढली आहे, दुसरीकडे लसीकरणासाठी गर्दी होत आहे. लॉकडाऊन असला तरी बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते. शनिवारी (दि. १) सर्वाधिक ४ हजार २१९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर रविवारी (दि. २) ३ हजार ८२२ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. शनिवारी ३ हजार ७५३ जणांना, तर रविवारी ३ हजार ७३९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत रविवारी ३८२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ७१२ इतकी झाली आहे.
रविवारी (दि. २) जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १२८८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८७ आणि अँटिजेन चाचणीत ९४७ रुग्ण बाधित आढळले. शनिवारी (दि. १) जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७५७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७४७ आणि अँटिजेन चाचणीत ७१५ रुग्ण बाधित आढळले होते.
--------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : १,५७,२९८
उपचार सुरू असलेले रुग्ण : २३७१२
मृत्यू : २०७१
एकूण रुग्ण संख्या : १,८३,०८१
-----------
असे आढळले बाधित
दिनांक घरी सोडले बाधित मृत्यू
१ मे ३७५३ ४२१९ ३७
२ मे ३७३९ ३८२२ ४१
एकूण ७४९२ ८०४१ ७८
--------------