विधानसभा निवडणूक विश्लेषण - शेखर पानसरे । संगमनेर : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपला बालेकिल्ला कायम राखत पुन्हा एकदा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत आठव्यांदा विजय मिळविला आहे़. विशेष म्हणजे थोरातांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय ठरला़.गत ३५ वर्षांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व थोरात करतात. थोरात यांची कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या मतदारसंघातील निवडणुकीला राज्यभरात महत्त्व प्राप्त झाले होते. राधाकृष्ण विखेंनी कॉँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी संगमनेर तालुक्यातील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला़. त्यासाठी खासदार सुजय विखे यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या़ मेळावे घेतले़. विखे-थोरात यांचे हाडवैर अवघ्या महाराष्टÑाला परिचित झाले़. संगमनेर विधानसभेची जागा भाजपला मिळण्यासाठी खासदार विखे प्रयत्नशील होते. १९९० पासून ही जागा शिवसेनेकडे असल्याने ही जागा शिवसेनेने सोडली नाही़. शिवसेनेने उद्योजक साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली. यापूर्वी नवलेंनी १९९५ ला थोरातांविरोधात जनता दलाकडून निवडणूक लढविली होती. त्यानंतर पुन्हा २४ वर्षांनी ते विधानसभा निवडणुकीत थोरातांविरोधात उभे होते. नवले यांना ६३ हजार १२८ मते मिळाली़. ते दुस-या क्रमांकावर राहिले. गृहनिर्माण मंत्री विखे व खासदार डॉ.विखे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात लक्ष घालत थोरातांना शह देण्याचा प्रयत्न केला. परंतु संगमनेर मतदारसंघातील जनतेने थोरात यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करत आठव्यांदा विधानसभेत पाठविले. विखेंनी संगमनेरात लक्ष घातल्यानंतर संगमनेरची निवडणूक चुरशीची होईल, असे अनेकांना वाटत होते़. काही वाहिन्यांनी थोरात पराभूत होणार असा कल दाखविला होता. प्रत्यक्षात मात्र, तसे काहीही घडले नाही. पहिली ते विसाव्या फेरीपर्यंत थोरात आघाडीवर होते. संगमनेर तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. हा विजय तालुक्यातील जनतेचा विजय आहे. माझ्यावर जनतेने कायम विश्वास ठेवला. अविश्रांतपणे सातत्याने काम केले असून आणखी कामे करण्यासाठी ताकद मिळणार आहे. तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम ठेवणार आहे. काँग्रेसची नवी फळी उभी राहिली असून पुन्हा एकदा काँग्रेस उभी राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ठाकरे, विखेंपुढे थोरातांची एकाकी झुंजदसरा मेळाव्यानंतर दुसºयाच दिवशी संगमनेरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांनीही नवले यांच्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यात सभा घेतल्या़. ठाकरे, विखे यांच्या आक्रमक प्रचाराला थोरातांनी सौम्य उत्तर देत एकाकी किल्ला लढविला आणि जिंकलाही़. थोरातांचे मताधिक्य वाढलेगेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांनी १ लाख ०३ हजार ५६४ मते घेतली होती़ ५८ हजार ८०५ मतांनी त्यांचा विजय झाला होता़. यंदा त्यांच्या मताधिक्यामध्ये वाढ झाली आहे़. संगमनेर विधानसभा मतदारसंघात यंदा ७१.७२ टक्के मतदान झाले. एकूण २ लाख ६९ हजार ६८९ मतदारांपैकी १ लाख ९३ हजार ४२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी पहिल्या क्रमांकाची १ लाख २५ हजार ३८० मते आमदार थोरात यांना मिळाली. यंदा थोरातांनी ६२ हजार मतांनी विजय मिळविला आहे़.
संगमनेरात थोरातांच्या विजयाचे अष्टक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:30 PM