संगमनेर : भाजपचे आमदार, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळे पाऊल उचलू नये याकरिता भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लवकरच महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार जाणार आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असे वक्तव्य केले. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष जनतेची सेवा करेल. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
नाशिक-पुणे महामार्गावरील घुलेवाडी फाटा येथे नव्याने होणाºया न्यायालयाच्या इमारतीची पाहणी शुक्रवारी ( ९ आॅक्टोंबर) मंत्री थोरात यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात म्हणाले, भाजप आमदार, कार्यकर्ते यांचे मनोबल वाढविण्यासाठी भाजपकडून अशी वक्तव्य केली जातात. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात अनेकांनी दर १५ दिवसाला सत्ता बदलाचे वक्तव्य केले होते.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी महसुलमंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, नाथाभाऊ व मी तीस वर्ष एकत्र राहिलो. वेगवेगळ्या पक्षात असताना मतमतांतरे असतात परंतू ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे विधानसभेतील व विरोधी पक्षनेते म्हणून केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांचा भाजपला फायदा झाला. मात्र, त्यांचा जो सन्मान व्हायला पाहिजे तो झाला नाही. यांचे आम्हाला वाईट वाटते. ‘आमच्या घरातले म्हणून तुम्ही त्यांना मारणार असाल तर माणूस नाराज होणारच’ असेही थोरात म्हणाले.
‘रिपब्लिक ’ने चौथ्या खांबाला पोखरण्याचे काम केलेटेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविणाºया रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. याबाबत महसुलमंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, टीआरपी घोटाळा कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुढे आणला होता. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीची भूमिका अ्राकस्तपणाची आहे. माध्यमे लोकशाहीचा चौथा खांब आहेत. मात्र, भ्रष्ट मार्ग अंवलबणे चुकीचे आहे. लोकशाहीच्या चौथ्या खांबाला पोखरण्याचे काम रिपब्लिक वृत्तवाहिनीने केले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी. असेही थोरात म्हणाले.