भेंडा : माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली.
संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ६ जानेवारी रोजी झालेल्या छाननीत १३५ अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११४ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली.
नवीन संचालक मंडळात ११ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर, जुन्या १० चेहऱ्यांची वर्णी लागली आहे.
बिनविरोध निवडून आलेले संचालक : शेवगाव गट- सुधाकर नरवडे, पंडित भोसले. शहरटाळकी गट- नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले. नेवासा गट- विठ्ठलराव लंघे, काकासाहेब शिंदे, गोरक्ष गंडाळ. ढोरजळगाव गट- मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे. कुकाणा गट- पांडुरंग अभंग, नारायण म्हस्के. वडाळा गट- भाऊसाहेब कांगुणे, जनार्दन कदम, शिवाजी कोलते. अनु. जाती/जमाती मतदारसंघातून दीपक नन्नवरे. महिला प्रतिनिधी ताराबाई जगदाळे, रत्नमाला नवले. भटके-विमुक्त मतदारसंघातून- लताबाई मिसाळ.
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक- पणन संस्था मतदारसंघ- देसाई देशमुख. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ-
शंकर पावसे
----
बाळासाहेब मुरकुटेंचाही अर्ज मागे
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, दत्तात्रेय काळे, संजय शिंदे, अरुण गरड, शिवाजी निकम, उद्धव नवले यांच्यासह ११४ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.