अहमदनगर : अखेर विद्यापीठाने महाविद्यालयांत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ७ सप्टेंबरला मतदान होणार असून, त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. त्यानंतर २४ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होईल.मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका यंदा पुन्हा होणार आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी बुधवारी या निवडणुकांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्था व विभागांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची अधिसूचना २१ आॅगस्टला प्रसिध्द केली जाणार आहे. दि. २९ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, ५ सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान होईल. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य सलग ४ तासांची मतदानाची वेळ निश्चित करतील. मतदानानंतर महाविद्यालयातच मतमोजणीकरून लगेच निकाल घोषित केला जाईल.महाविद्यालयांमधील निवडणुका झाल्यानंतर ९ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक अधिसूचना प्रसिध्द केली जाईल. १४ व १५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणे, १९ व २० सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे, २४ सप्टेंबर मतदान, तर २७ सप्टेंबरला मतमोजणी व निकाल असा निवडणूक कार्यक्रम असेल.महाविद्यालय निवडणूक वेळापत्रकनिवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करणे - २१ आॅगस्टमागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी आरक्षण सोडत - २३ आॅगस्टमतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवण - २६ आॅगस्टअंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे - २७ आॅगस्टउमेदवारी अर्ज दाखल करण - २९ आॅगस्टअर्ज छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिध्द करणे - ३१ आॅगस्टअर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणे - ३ सप्टेंबरअंतिम अर्जाची यादी प्रसिद्ध करणे - ४ सप्टेंबरअर्ज माघारी घेणे - ५ सप्टेंबरमतदान, मतदानानंतर मतमोजणी व निकाल - ७ सप्टेंबरउमेदवारांच्या खर्चाचा हिशोब सादर करणे - ९ ते २१ सप्टेंबर
महाविद्यालयांत ‘इलेक्शन फिवर’ : निवडणुका ७ सप्टेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:11 PM