अहमदनगर : जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मूदत संपणार्या ग्रामपंचायती अथवा विभाजनामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या चार तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती आणि कंसात तालुका पुढील प्रमाणे : नेवासा बुद्रूक(नेवासा), पिंपळस (राहाता), भोयरे पठार, पारगाव भातोडी, मजले चिंचोली, पारेवाडी, आव्हाड वाडी, भोयरे खुर्द (नगर) आणि मोकळ आहोळ (राहुरी) यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २ मे रोजीपर्यंत मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. २० मे ला राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची अधिसूचना जाहीर केलेल्या तारखेपासून अस्तित्वात आलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
नऊ ग्रामपंचायतीची निवडणूक
By admin | Published: May 19, 2014 11:25 PM