अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या २१ पैकी इतर सर्व १७ जागा बिनविरोध झाल्या असून नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती अशा चार मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.
जिल्ह्या बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. गुरुवारी अखेरचच्या दिवशी १२ जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अकोले- सीताराम गायकर,संगमनेर- माधवराव कानवडे, कोपरगाव- विवेक कोल्हे, राहाता- अण्णासाहेब म्हस्के, राहुरी- अरुण तनपुरे, नेवासा- शंकरराव गडाख, श्रीगोंदा- राहुल जगताप, जामखेड -जगन्नाथ राळेभात, पाथर्डी- मोनिका राजळे, श्रीरामपूर- भानुदास, शेवगाव- चंद्रशेखर घुले हे बिनविरोध निवडून आले. शेतीपूरक मतदारसंघातून आशुकोष काळे, अनूसूचित जाती- अमित भांगरे, इतर मागास वर्ग-करण ससाणे, महिला प्रतिनिधी- अनुराधा नागवडे व आशा तापकीर, भटक्या विमुक्त जाती- गणपत सांगळे यांची निवड बिनविरोध झाली.
कर्जतमध्ये अंबादास पिसाळ व मीनाक्षी साळुंके यांच्यात, नगर मतदारसंघा शिवाजी कर्डिले व सत्याभामा बेरड, पारनेरमध्ये उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात तर बिगर शेती मतदारसंघात दत्ता पानसरे व सबाजी गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.