रुईछत्तीसी : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. येथे यंदाही दोन पॅनलमध्येच रणधुमाळी होण्याची शक्यता आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीकांत जगदाळे आणि रवींद्र भापकर संचालित परिवर्तन पॅनल आणि रमेश भांबरे संचालित ग्रामविकास पॅनल समारोसमोर उभे ठाकले होते. २०२०-२५ या पंचवार्षिक मुदतीसाठी हेच दोन पॅनल समोरासमोर आहेत. मागील निवडणुकीत ११ पैकी ६ जागा जिंकून ग्रामविकास पॅनेलने बहुमत सिद्ध केले होते. तीन वर्षांच्या काळानंतर ग्रामविकास पॅनलमधील तीन भाग प्रशासकीय अडचणीतून रद्द करण्यात आला. परिणामी विरोधी गटाच्या मीनाक्षी जगदाळे सरपंच झाल्या. दोन वर्षे त्यांनी सरपंच म्हणून चांगले काम केले. आता या दोन गटांतच निवडणूक रंगणार आहे. नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भापकर आणि श्रीकांत जगदाळे यांनी माजी सरपंच रमेश भांबरे यांच्या विरोधात कंबर कसली आहे. गावच्या विकासासाठी दोन्ही गटांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. मतदार आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.