अहमदनगर : गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच वादळीवाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, वीज पडून चौघांचा मृत्यू झाला आहे. ४ जनावरेही दगावली, तसेच १० घरांची पडझड झाली.गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारांचाही पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीत संभाजी शंकर पाटोळे (वय ६३ रा. करमनवाडी, ता. कर्जत) व बकुळाबाई तान्हाजी गिºहे (वय ३२, पिसोरे बु., ता. श्रीगोंदा) या दोघांचे ४ एप्रिल, राहुल बाळासाहेब पवार (वय ३२, कोहकडी, ता. पारनेर) यांचा १४ एप्रिल, तर बाळासाहेब निवृत्ती साबळे (वय ५०, खराडी, ता. संगमनेर) यांचा १५ एप्रिल रोजी वीज पडून मृत्यू झाला. त्यांना शासनाकडून ४ लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.याशिवाय वीज पडून दशमीगव्हाण (ता. नगर), पिसोरे (ता. श्रीगोंदा), अंभोरे (ता. संगमनेर) व मतेवाडी (ता. जामखेड) येथे चार जनावरे ठार झाली.संगमनेर तालुक्यातील डिग्रस, पिंपळे, मांडवे येथे १० घरांची पडझड झाली. याशिवाय अनेक ठिकाणी फळबागा, कांदा आदी शेतीपिकांचे नुकसान झाले.दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
वीज पडून दहा दिवसात चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:17 AM