शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘विघ्नहर्त्याला’ ठिकठिकाणी भावपूर्ण निरोप

By admin | Published: September 09, 2014 11:14 PM

मंगलमय वातावरणात ‘बाप्पा’ ला सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका चालू होत्या.

अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - ढोल ताशांचा गजर.....लेझीम, झांजवादनाचा झंकार....रंगीबेरंगी फुलांची आसमंतात केलेली उधळण ... अशा मंगलमय वातावरणात ‘बाप्पा’ ला सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका चालू होत्या.दहा मंडळांचा नेवाशात सहभागनेवासा : येथील विसर्जन मिरवणुकीत दहा गणेश मंडळे सहभागी झाली होती. दुपारी तीन वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. अग्रभागी ११७ वर्षाची परंपरा असलेला मानाचा गणपती होता. पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, नेवाशाचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या हस्ते गणपतींचे पूजन झाले. सर्व गणेश मंडळाचे मोहिनीराज मंदिर चौकात स्वागत करण्यात आले. मित्रपरिवार व त्रिमूर्ती या मंडळांनी उत्कृष्ट लेझीम पथक तर किसनगिरी बाबा व मोहिनीराज मंडळाने ढोल पथक सादर केले. घाटावरील मानाच्या गणपतीचे सायंकाळी सव्वा सात वाजता तर शेवटच्या गणपतीचे रात्री पावणेअकराच्या सुमारास प्रवरा नदी पात्रात विसर्जन झाले. शेवटच्या गणपतीची रात्री पावणे अकरा वाजता पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक भरत मोरे यांच्या हस्ते आरती झाली. भेंडा येथे रात्री नऊपर्यंत सार्वजनिक व घरगुती गणेशाचे विसर्जन झाले. फटाक्याची आतषबाजी व वाद्यांच्या सुरांनी मिरवणुकीत रंगत आली. ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या मिरवणुकीत अध्यक्ष अनिल शेवाळे, कार्याध्यक्ष काकासाहेब शिंदे, अशोक भूमकर, तसेच अधिकारी, पदाधिकारी सहभागी झाले होते. सोनईसह घोडेगाव, शनि शिंगणापूर, शिरेगाव, लोहगाव व परिसरात शांततेत गणेश विसर्जन झाले. शिवगर्जना ग्रुपच्यावतीने दहा दिवस बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांना चिक्कीचे वाटप करण्यात आले. पोलीस ठाण्याच्या ‘श्री’ची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. पारनेरला अनेक मंडळांचा पारंपरिक मिरवणूक सोहळापारनेर : पारनेर शहरासह तालुक्यात गणेशाचे शांततेत विसर्जन झाले. डीजे व इतर अत्याधुनिक वाद्यांना फाटा देऊन अनेक मंडळांनी पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढली. दरम्यान, तालुक्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्जन झाले.पारनेर शहरात दरवर्षी रात्री उशिरा गणेशाचे विसर्जन म्हणून प्रसिध्द असलेल्या जय भवानी मित्र मंडळ व गणपती गल्ली मित्र मंडळाच्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी सोमवारी गुलाल,डिजे यांना फाटा देत सर्व युवक वारकरी वेशात व त्यांच्या हातात असलेल्या टाळ-मृदुंगाने वातावरण भक्तिमय झाले होते. तसेच महिलांचा मोठा सहभाग आणि फुगड्यांच्या खेळाने मिरवणुकीत रंगत आली. ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. नागेश्वर मित्र मंडळाने मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतला नाही. पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या गणेश मंडळानेही टाळ-मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली. मुख्य मिरवणुकीत सागरदास मित्र मंडळ, पारनेरकर महाराज मित्र मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, क्रांती तरूण गणेश मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, पतित पावन संघटना, पराशर मित्र मंडळ, नो चॅलेंज मित्र मंडळ, सेनापती बापट मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंंडळ, पद्मावती मित्र मंडळ, साईरूद्र मित्र मंडळ, पाटाडी वस्ती मित्र मंडळ यांनी सहभाग नोंदविला. पारनेरच्या मुख्य वेशीतून गेल्यानंतर वरच्या वेशीजवळील बारवेत रात्री दहापर्यंत सर्व गणेश मंडळांनी गणेशाचे शांततेत विसर्जन केले. राळेगणसिध्दी येथे ‘एक गाव एक गणपती’ उत्सव साजरा करण्यात आला. दुपारी निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही सहभागी झाले होते. यावेळी गावातील महिला व तरूण मंडळांचा मोठा सहभाग होता. गोेरेगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा लक्षवेधी झाला. प्रत्येक गणेश मंडळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामुळे मिरवणूक सोहळ्यात महिला व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. निघोज येथे मळगंगा मित्र मंडळ, साईधाम मित्र मंडळ, सहकार मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ या मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. सायंकाळी सात वाजता सुरु झालेल्या मिरवणुकीची रात्री साडेदहा वाजता सांगता झाली. कान्हूरपठार येथे गणेश मंडळांनी ढोल व झांज पथक आणले होते. तेथील मिरवणूक लक्षवेधी ठरली. टाकळीढोकेश्वर येथे सावता माळी, शिवसम्राट, राजे छत्रपती प्रतिष्ठान या मंडळानी मिरवणुकीत सहभाग नोंदविला तर वासुंदे येथे उत्कर्ष मित्र मंडळाने मिरवणुकीने गणेश विसर्जन केले. भाळवणी, सुपा, अळकुटी,वडझिरे, वाडेगव्हाण तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये शांततेत गणेश विसर्जन झाले.जामखेडमध्ये ९ तास मिरवणूकजामखेड : जामखेडसह तालुक्यातील मंडळांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दुपारी तीननंतर ट्रॅक्टरमधील रथावर गणेश मूर्ती ठेवून सजावट करण्यात आली. मेनपेठेत सायंकाळी सातच्या सुमारास मिरवणूक आल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली. यंदा जामखेड व तालुका मिळून एकूण ४७ सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. गेल्या दहा दिवसात काही मंडळांनी सामाजिक तर काही मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते. दुपारी तीन वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक रात्री बारापर्यंत चालू होती. जामखेड येथील २१ मंडळांनी गणेश विसर्जन केले. यामध्ये तीन बाल मंडळांचा समावेश आहे. तालुक्यातील खर्डा, नान्नज, जवळा, नायगाव, हळगाव, आनंदवाडी, तरडगाव, मोहा, धामणगाव, शिऊर, धनेगाव, बांधखडक, बसरवाडी तसेच इतर ठिकाणी शांततेत गणेश विसर्जन झाले. पाथर्डीत आठ तास मिरवणूकपाथर्डी : शहर व तालुक्यात ‘श्री’ चे उत्साहात विसर्जन झाले.ढोल, ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. विसर्जन मिरवणूक सुमारे आठ तास चालली. सकाळी दहा नंतर घरगुती ‘श्री’ चे विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळानी ‘श्री’चे विसर्जन केले. नगराध्यक्ष राजेंद्र उदमले, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, हिंदकुमार औटी, अ‍ॅड.दिनकर पालवे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर काटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख, लक्ष्मणराव हंडाळ आदींनी चौकात गणेश मंडळांचे स्वागत करुन पूजन केले. नवोदय तरूण मंडळ, जय भवानी तरूण मंडळ , गणेश पेठ तरूण मंडळ, विश्वकर्मा तरूण मंडळ, कसबा व्यायाम शाळा, जिवा भावाची माणसे कसबा विभाग आदी मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला. पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व होमगार्डसने बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यातील मिरीचे ग्रामस्थ व गावातील सर्व मंडळांच्या सहकार्याने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ‘एक गाव एक गणपती’ची दुपारी चार वाजता सुरु झालेली विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालू होती. मिरवणुकीत जेऊर हैबती येथील जुने पारंपारिक वाद्य, सनई व चौघडा होता. पाणावलेल्या डोळ्यांनी व ‘पुढच्यावर्षी लवकर या’ च्या घोषणेने कार्यकर्त्यांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. कर्जतमध्ये १३१ मंडळांचा सहभागकर्जत : कर्जत तालुक्यात १३१ गणेश मंडळांनी शांततेत गणेश विसर्जन केले. रात्री बारा वाजता विसर्जन मिरवणुका संपल्या. कर्जतसह राशीन, मिरजगाव, कुळधरण, माहिजळगाव, खेड येथील १३१ गणेश मंडळांनी मिरवणुका काढल्या. यावेळी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात आला. कर्जत येथील गवंडे गल्ली मित्र मंडळाच्यावतीने साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेऱ्यामुळे कर्जतमधील चोऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. ही संकल्पना वैभव शहा मांडली. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला. सहा मंडळांचा सहभागशेवगाव : शेवगाव येथे यंदा मानाच्या मिरवणुकीत सहा मंडळे सहभागी झाली होती. तहसीलदार हरिष सोनार यांनीे मानाचा लाटे गणपती व जाधव वाड्यातील गणपतीची साडेचारच्या सुमारास आरती केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत लाटे व जाधव वाड्यातील गणपती, भोईराज, भगतसिंग, शिवशक्ती, टिळक व वडार समाजाच्या गणपती मंडळांनी सहभाग घेतला. सकाळपासून निरनिराळ्या मिरवणुकीत संकल्प, राजमुद्रा, जाणता राजा, गजराज, राजयोध्दा, ओमसाई, द्रोणाचार्य, नेता सुभाष, अचानक, स्वराज्य, एस.टी. कामगार संघटना, वंदे मात्रम या मंडळांनी डीजे, लेझीम पथक, झांज पथकाव्दारे मिरवणुका काढल्या. मोहिनीराज मंडळाने ढोल, लेझीम पथक व ‘झाडे लावा, झाडे जगवा’ चा संदेश दिला. संकल्प युवा ग्रुपची मिरवणूक शेवगाव येथे लक्षवेधी ठरली.खर्ड्यात टाळ, मृदुंगाच्या गजरात मिरवणूकखर्डा : हभप सीताराम महाराज उंडेगावकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर खर्डा येथे श्री गणेश व गौरींची साध्या पध्दतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. सीताराम गडावरुन टाळ, मृदुंग व विठ्ठल नामाच्या गजरात गणेशाची साध्या पध्दतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी गणेशोत्सवात करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई, देखाव्यांना कार्यकर्त्यांनी यंदा फाटा दिला. सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सीताराम गडावर एकत्र येऊन भक्तिगीते गाऊन विठ्ठल नामाचा गजर केला. त्यानंतर गावातून दिंडी काढण्यात आली. मिरवणुकीत जामखेडचे तहसीलदार दराडे, सहाय्यक फौजदार लक्ष्मण घोडके, कामगार तलाठी बनसोडे, इतर अधिकारी, पदाधिकारी सहभागी झाले होते. सीताराम गडावर रात्री अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे हरीकीर्तन झाले. भक्तांनी गडावर रात्रभर हरीजागर केला. स्व. हभप सीताराम महाराज उंडेगावकर महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी गडावर भाविकांची दिवस-रात्र गर्दी होत आहे.