श्रीरामपूर : रोजगार हमी योजनेत स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेण्याबाबत राज्य सरकारने १३ जानेवारी, २०२१ रोजी आदेश पारित केला. यात जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घ्यावे, असे निवेदन संस्थांचे राज्य समन्वयक सुनील साळवे व प्रमिला ढगे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले.
मृदा व जलसंधारण, वृक्षसांगोपन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या कामांची ग्रामपातळीवर अंमलबजावणी करताना स्वयंसेवी संस्थांना सामावून घ्यावे. तसे केल्यास योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होईल. लोकसहभाग वाढविता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
लोककल्याणकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्यातील २५ संस्था प्रशासनासोबत कार्य करण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांचा सहभाग घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संतोष कदम, दादासाहेब साठे, प्रमोद पत्की, विनोद सुतावणे, सुदर्शन निकाळे आदींच्या सह्या आहेत.
....
फोटो -१७श्रीरामपूर निवेदन
...
ओळी- भारत अभियान अंतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना, राज्य समन्वयक सुनील साळवे, प्रमिला ढगे आदी.