श्रीगोंदा : वन, महसूल व पोलीस यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी श्रीगोंदा शहराच्या सीमारेषेवर असणाऱ्या पेडगाव रस्त्यावरील वन विभागाच्या जागेतील पक्की बांधकामे केलेली बेकायदा १३ घरे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर एका अपंगासह गोरगरीब कुटुंबांनी एकच आक्रोश केला.पेडगाव रस्त्यावर वन विभागाची सुमारे ४० हेक्टर मोकळी जमीन आहे. या जमिनीवरील काही झाडे तोडून १३ कुंटूबांनी अतिक्रमण करून बेकायदा घरे बांधली. अनेक धनदांडग्या मंडळीनी जागा धरली होती. त्यामुळे वन विभागाची मोठी जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होती. श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन, वन विभागाच्या भरारी पथकाचे वन परिक्षेत्रपाल सुनील शेटे, अश्विनी दिघे यांनी पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी जेसीबीच्या साह्याने पक्की घरे उद्ध्वस्त केली. दरम्यान काही जणांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबविण्यात आली. त्यामुळे गोरगरिब माणसांना शेड काढण्यास काही कालावधी मिळाला.महिलेने फोडला हंबरडाएक महिन्यापूर्वी शेळ्या विकून घर बांधले. वास्तूशांती होण्यापूर्वीच घर पाडले. आता परमेश्वरा, पावसात कुठ जायचं? लेकरंबाळं बाळ उघड्यावर आली, असे म्हणत अनिता कुंडकर या महिलेने हंबरडाच फोडला.सर्वच सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटविणारजिल्हाधिकारी कार्यालयाने शनिवारी दुपारपर्यंत अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबविली आहे. त्यामुळे स्वत:हून अतिक्रमणे काढावीत, अन्यथा अतिक्रमणे पाडून साहित्य जप्त करण्यात येईल. तालुक्यातील सर्व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.-महेंद्र महाजन, तहसीलदार, श्रीगोंदा.अपंग कुटूंब बेघरआम्ही नवरा बायको अपंग आहोत. बचत गटातील पैसे उचलून शेड उभे केले. पण आता शेड काढण्याची वेळ आली. धरणीवर जागा नाही. खूप वाईट झालं. आता आम्ही कुठं जायचं.-जयश्री माने, अपंग महिला.