अण्णा नवथर, अहमदनगर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सकाळी दहा वाजताच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. पाथर्डी तालुक्यातील मीडसांगवी येथे ही पदयात्रा दाखल झाली. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराठी येथून प्रारंभ झालेली पदयात्रा शनिवारी बीड जिल्ह्यातील मातोरी गावात मुक्कामी होती. सकाळी मातोरी येऊन पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केले. सकाळी दहा वाजता पाथर्डी तालुक्यातील बीड सांगवी येथे या पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी हजारो मराठा बांधव तेथे उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज पाटही बंदोबस्त साठी तैनात करण्यात आला आहे.
आज संध्याकाळी अहमदनगर येथे नगर पाथर्डी महामार्गावरील बाराबाभळी येथे दीडशे एकर मैदानावर पदयात्रेचा मुक्काम राहणार आहे. तेथे सायंकाळी पाच वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. जेवणासाठीचे स्टॉल ,पिण्याच्या पाण्याची सोय आदी चोख व्यवस्था सभास्थळी करण्यात आली आहे. पदयात्रा दाखल झाल्यानंतर महिलांनी जरांगे पाटील यांच्या बाजूने कडे करून पदयात्रा पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला.