राहुरी : सोळा वर्षापूर्वी पाच-दहा झाडे असलेल्या माळरानावरील शाळेत नंदनवन फुलविण्यात यश आले आहे़ दीड हजार कडूलिंब असलेली अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून राहुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाकडे पाहिले जाते़ २००३ मध्ये हरित सेनेची स्थापना करण्यात आली़ त्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग विविध उपक्रमाव्दारे वाढत गेल्याने परिसर निसर्गरम्य बनला आहे़वृक्ष लागवडीपासून ते संगोपनापर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते़ त्यातून पर्यावरणाला मदत होत आहे़ शालेय परिसरात हजारो झाडे दिमाखाने उभी आहेत. विद्यार्थी व शिक्षकांनी करंज, लिंब, काशिद, आवळा, पळस, सप्तपर्णी, अडुळसा, बेहडा, हिरडा, आवळा अशा विविध प्रकारची झाडे लावली आहेत.वृक्ष लागवडीबरोबरच जास्तीत जास्त झाडे जगविण्यावर सावित्रीबाई फुले विद्यालयाने भर दिला आहे़ वृक्षसंपदा वाढल्यामुळे साळुंकी, टिटवी, कावळे, चिमण्या, बुलबुल, भारव्दाज आदी पक्ष्यांची संख्या परिसरात वाढली आहे़ शालेय परिसराचे सुशोभिकरण करताना हरित सेनेच्या माध्यमातून कचरा होळी अर्थाव कचऱ्यापासून कंपोस्ट खत करण्याचे प्रशिक्षण दिले जाते़ रंगपंचमीला नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते़ फु ले, पाने व फळे यापासून तयार केलेल्या नैसर्गिक रंग विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला जातो़ केमिकलपेक्षा नैसर्गिक रंग आरोग्याच्यादृष्टीने किती महत्वाचे आहे याची प्रचिती विद्यार्थ्यांना येते़ झाडांना रक्षाबंधन करून झाडे जगविण्याची प्रतीज्ञा विद्यार्थ्यांना दिली जाते़ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड वृध्दिंगत व्हावी म्हणून प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते़ पर्यावरण पूरक हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो़ वडाचे झाड लावून त्याची पूजा केली जाते़ कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टीकचे दुष्परिणाम सांगितले जातात़ पर्यावरण पूरक प्रतिज्ञेचे आयोजन केले जाते़ दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जाऊ नये म्हणून प्रबोधन केले जाते़केनियाच्या अभ्यासक ह्यूमा मॅडम यांना एकाच शाळेत एवढ्या मोठया प्रमाणावर लिंबाची झाडे आहेत म्हणून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखालीच माहिती देण्यासाठी आल्या़ वृक्षारोपण केल्याबद्दल वनीकरण विभागाच्या कीर्ती कोकाटे यांनी भेट देऊन कौतुक केले़ वृक्षारोपणामुळे तापमानाचे प्रमाण क मी झाले असून आरोग्य उंचावण्यास मदत झाली आहे़- बाळासाहेब डोंगरे, सचिव, हरित सेना सावित्रीबाई फुले विद्यालय.
पर्यावरण प्रेमी शाळा; माळरानावर नंदनवन भाऊसाहेब येवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 4:53 PM