शिर्डी : महाराष्टÑात प्लॅस्टीक बंदी असताना साईबाबा मंदिर परिसरात साईभक्तांच्या हातात प्लॅस्टीक पिशव्या पाहून पर्यावरण मंत्री रामदास कदम हे कमालीचे संतप्त झाले. अधिकाऱ्यांना फैलावर घेत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.सोमवारी कदम शिर्डीत आले होते. साई मंदिरात दर्शनासाठी आले असता अनेक भाविकांच्या हातात फुल-हार व प्रसादाने भरलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या बघून ते भलतेच संतापले. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल तसेच नगरपंचातीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची कदम यांनी कान उघडणी केली. दोनदा सूचना देऊनही तिस-यांदा प्लॅस्टीक पिशव्यांची विक्री होत असेल तर अशा विक्रेत्यांवर ३ महिने कैदेची कारवाई केली पाहिजे, असे कदम म्हणाले. साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले. शिर्डीत प्लॅस्टीक बंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल कदम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी शिवसेना नेते भाऊ कोरेगावकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे संपर्कपममुख दत्ता आव्हाड, जिल्हाप्रममुख मुकूंद सिनगर आदी उपस्थित होते.जागतिक पयावरण दिनी प्लॅस्टीक बंदी करणारे महाराष्टÑ हे १८ वे राज्य आहे. राज्य शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कायद्याची अंमलबजावणी करणे सर्वांची जबाबदारी आहे. यापुर्वी शिर्डीतील विक्रेत्यांवर दोनदा दंडात्मक कारवाई केली. अनेकदा सूचना देऊनही काहीच होत नसेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. साई संस्थानच्या सुरक्षा नगरपंचायत मुख्याधिकाºयांना प्रेमपत्र पाठवू. ऐकले नाही तर नाईलाजाने संस्थानवर कारवाई करावी लागेल. - रामदास कदम, पर्यावरण मंत्री