या पत्रात गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात दरोडे व महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोठेवाडी ते कोपर्डी आढावा घेतला तर अशा घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. २० डिसेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा येथे दरोडेखोरांनी एका ज्येष्ठ महिलेच्या घरावर दरोडा टाकून ५० हजारांचा ऐवज चोरला. यावेळी दरोडेखोरांनी महिलेच्या कानातील दागिने ओढल्याने त्यांच्या कानाच्या दोन्ही पाळ्या तुटल्या आहेत. ही गंभीर घटना आहे. तसेच जमिनीतून सोने काढून देतो, असे आमिष दाखवून काही भोंदूबाबा लोकांची फसवणूक करताना आढळून आले आहेत. अशा भोंदूबाबांकडून महिलावर अत्याचार झाल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. अशा लोकांवरही कडक कारवाई करावी, अशा सूचना गोऱ्हे यांनी या पत्राच्या माध्यमातून दिल्या आहेत.
दरोडेखोरांच्या बंदोबस्तासाठी विशेष पथक स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:17 AM