शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

तर कर्डिलेंशीही दोन हात केले असते : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:23 IST

भाजपाने आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली असती तर त्यांच्याशीही राष्ट्रवादीने दोन हात केले असते.

अहमदनगर : भाजपाने आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली असती तर त्यांच्याशीही राष्ट्रवादीने दोन हात केले असते. त्यामुळे कर्डिले आणि आमची छुपी युती आहे, हा आरोप खोटा आहे. नाते-गोते, पक्षीय बांधिलकी या दोन भिन्न गोष्टी असून आम्ही विचारांशी बांधिल आहोत, असे स्पष्ट मत आमदार संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत व्यक्त केले.प्रश्न- काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रेम कसे जमले ?जगताप- काँग्रेस- राष्ट्रवादीने सन २०१३ ची महापालिका निवडणूक एकत्रित लढविली. त्यावेळीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आला. त्यानंतर चारही पक्ष वेगवेगळे लढले आणि आता पुन्हा ही निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवित आहेत. पक्षाकडून तशा सूचना आल्या. समविचारी पक्षांनी एकत्र यावे असे ठरले. त्या भावनेने आम्ही पुन्हा एकदा मनापासून एकत्र आलो आहोत.प्रश्न- कोणता मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार ?जगताप - निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही पक्षाचा अजेंडा हा विकासाचा असायला पाहिजे़ मला नगरकरांनी महापालिका व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संधी दिली़ विकासाचा मुद्दा राष्ट्रवादीने सर्वप्रथम नगरकरांसमोर मांडला. तो नगरकरांना पटला. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो. ही निवडणूकही राष्ट्रवादी विकासाच्याच मुद्यावर लढविणार आहे.प्रश्न- राष्ट्रवादीचा अजेंडा काय आहे ?जगताप- मागील निवडणुकीत दोन्ही काँग्रेसवर नगरकरांनी विश्वास दाखविला. त्यामुळे शहरात काही कामे आम्ही प्रभावीपणे करू शकलो. मात्र सत्ता पूर्णपणे नसल्याने विकास कामे हाणून पाडण्याचा प्रयत्न होत होता. परंतु, त्यानंतरच्या काळात विधानसभा व महापालिकेच्या माध्यमातून नगरकरांनी ताकद दिल्याने विरोधकांचे सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडले. शासनाने ४० कोटींचा निधी दिला. मात्र त्याला परत स्थगिती लावण्यात आली. असे प्रकार आम्ही मोडीत काढले़ यापुढेही याच पध्दतीने काम करून नगर शहराला पुढे नेण्याचे काम केले जाईल.प्रश्न- निवडणुकीत धनदांडग्यांना तिकिटे दिली जातात़ ते निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च करून निवडून येतात, असे बोलले जाते़ यासंदर्भात राष्ट्रवादीने काय भूमिका घेतली ?उत्तर- राष्ट्रवादीने अनेक सुशिक्षितांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. विपुल शेटीया हे एक उत्तम व्यापारी आहेत. संजय चोपडा यांचा एक व्यापारी म्हणून नावलौकिक आहे. हॉटेल व्यवसाय आहे, म्हणून राजकारणात येऊ नये, असे नाही़ आम्ही फक्त पक्षाच्या माध्यमातून संधी देता़े़. पुढे त्याला संधी द्यायची की नाही ते मतदार ठरवितात.प्रश्न- नगर शहरात भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे राजकारण राष्ट्रवादीच्या हिताचे असते ?उत्तर- हा आरोपाचा एक भाग आहे. शेवटी क ोणी कोणाशी सोयरीक करायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.  नगरकर काही दूधखुळे नाहीत. ते भाजपाचे असले तरी त्यांच्याकडे भाजपाने प्रमुख भूमिका दिलेली नाही. तशी जबाबदारी दिली असती तर वेगळे चित्रं नगरकरांना दिसले असते. वेळप्रसंगी त्यांच्याशी दोन हात करण्याची आमची तयारी आहे. पण तशी वेळ अद्यापर्यंत आलेली नाही.

प्रश्न -शाळांची दुरवस्था झाली ?उत्तर- महापालिकेच्या शाळा पुन्हा कार्यरत झाल्या पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, खासगी शाळांमुळे परिणाम झाला आहे. शासनाकडून इमारत उभारण्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रश्न- सेना,राष्ट्रवादीच्या छुप्या युतीमुळे शहराचे वाटोळे झाले, असा आरोप तुमच्यावर केला जातोय, काय सांगाल?उत्तर- राष्ट्रवादीने कधीही कुठल्याही पक्षाशी छुपी युती केली नाही. आमचा पक्ष विचाराशी प्रामाणिक राहिलेला आहे. महापालिकेत वरिष्ठ पातळीवरून ज्या सूचना आल्या. त्यानुसारच आम्ही नगर शहरात काम करत आहोत.प्रश्न- नगरमध्ये सोधा पक्ष आहे?उत्तर- सोधा पक्ष हा फक्त वृत्तपत्रातून वाचतो आहे. तसेच काही जे असंतुष्ट लोक आहेत, त्यांच्याकडूनही ऐकला आहे. ते सर्वच पक्षात असतात. सोधा पक्षाचा कार्यकर्ता अजून भेटलेला नाही. भेटल्यास निश्चित त्याच्याशी चर्चा करील.प्रश्न- कर्डिलेंकडे जबाबदारी असती तर भाजपाला यश मिळाले असते का?उत्तर- पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिली असती तरी भाजपाला यश मिळाले नसते. पण, त्यांची भूमिका काय आहे आणि आमची भूमिका काय आहे, ते स्पष्ट झाले असते़ यश कोणाला द्यायचे ते नगरकर ठरवतील.प्रश्न- शहर बससेवा बंद होण्यास जबाबदार कोण ?उत्तर- महापौर असताना शहर बससेवा सुरू केली. त्यानंतर सेनेची सत्ता आली़ त्यांनी तक्रारी केल्या आणि त्यांनीच ती बंद पाडली.प्रश्न- सत्तेवर आल्यानंतर कोणते प्रश्न सोडविणार ?उत्तर- बससेवा हा महत्वाचा प्रश्न सोडविला जाईल़ बुरुडगाव व सावेडीचा कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावणार आहे. सावेडीत कचरा डेपो नव्हता. पण सेनेने तेथे खत प्रकल्पाऐवजी कचरा डेपो केला. दोन्ही ठिकाणी खत प्रकल्प, डिपी रोड, एमआयडीसी, रोजगार यावर काम करणार आहे.प्रश्न - महापौर द्या तीनशे कोटी देऊ, असे भाजपाने सांगितले आहे, काय सांगाल?उत्तर- अधिवेशनाला जातो.  त्यावेळी वेगवेगळ्या पक्षाचे आमदार भेटत असतात. तसे भाजपाचेही भेटतात. आश्वासन केवळ निवडणुकीपुरते असत़े. आमिष दाखविण्याचा प्रकार आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी तीनशे कोटी द्यायचे होते. आम्ही तीनशे कोटी आणले आहेत, आता तुम्ही सत्ता द्या, असे त्यांनी सांगायला हवे. त्या विश्वासावर त्यांना जनतेने सत्ता दिली असती़ परंतु, त्यांनी नगरकरांना एकप्रकारे तीनशे कोटींची धमकीच दिली आहे.प्रश्न- केडगाव काँग्रेस फुटीमागे जगताप, कर्डिले, विखेंचा हात आहे का ?उत्तर- केडगावच्या जागा काँगे्रसला दिलेल्या होत्या. त्यामुळे त्याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. त्याबाबत तेच सखोल माहिती देऊ शकतील.प्रश्न- एका रात्रीत काँग्रेसचे उमेदवार भाजपमध्ये कसे गेले ?उत्तर- केडगावचे काँग्रेसचे उमेदवार भाजपात कसे गेले. त्यामागे काय झाले, ते माहिती नाही. मात्र या जागा राष्ट्रवादीकडे असत्या तर निश्चितच राष्ट्रवादीने खुलासा केला असता.प्रश्न- राठोड नावाचे राष्ट्रवादीला आकर्षण आहे?उत्तर- आकर्षण कुणाला कुणाचे नसते. त्यांच्याकडे असला म्हणजे तो एकदम चारित्र्य संपन्न आहे. त्याच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही. पण सेनेतून बाहेर पडला की, तो मावळ्याचा कावळा होता, असा आरोपांचा त्यांच्याकडे एक छापिल फॉर्मच आहे. वर्षानुवर्षे ते एकच प्रकारचे आरोप करीत आले आहेत. ते जे सांगतात तेच स्वत: आता दुर्लक्षित झालेले आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.प्रश्न- औद्योगिक पीछेहाटीला जबाबदार कोण ?उत्तर- नगरचा औद्योगिक विकास होणे अत्यंत महत्वाचे आहे. यावर नेहमीच चर्चा होत असते. यापूर्वीचे आमदार विधानसभेत यावर कधी बोलले नाहीत. मला संधी मिळाल्यानंतर विधानसभेत अनेक प्रश्न मांडलेले आहेत. औद्योगिकीकरणासाठी जागेची मागणी विधानसभेत केली आहे. त्यावर निर्णय होईल.प्रश्न- गिरवले यांना भाजपाने उमेदवारी दिली ?उत्तर- राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली नाही. त्यांना असे वाटले असेल की भाजपाच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो, या भावनेतून गेले असतील. स्व. गिरवले मामा व माझे वडील यांच्याशी माझे काय संबंध होते ते वडील सांगू शकतील आणि माझा व त्यांचा काय ऋणानुबंध होता ते मी सांगू शकतो. शेवटच्या श्वासापर्यंत ते सोबत होते़ त्यांचा मला आदर आहे. तो कायम मनात राहणार आहे. माझ्यावर प्रसंग आला ते धावून आले. त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. सुटकेनंतर मी नगरमध्ये आल्यानंतर स्वत: च्या घरी न जाता गिरवले मामांच्या घरी गेलो. माझी प्रामाणिक भावना आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाSangram Jagtapआ. संग्राम जगतापShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिले