दळवी यांचा स्कोअर १५ च्या वर गेला असताना चिंभळे येथील हंगेश्वर कोविड सेंटरमधील वैद्यकीय पथकाने सेवाभावी वृत्तीने उपचार केले. आठ दिवसांत आजींनी कोरोनावर मात केली. या आजी निराधार असल्याने भावाकडे राहत होत्या; पण भावाचा कोरोनात मृत्यू झाला. नंतर पार्वती दळवी यादेखील कोरोनाबाधित झाल्या. भावाच्या मुलीने या आजींना चिंभळे येथील हंगेश्वर कोविड सेंटरमध्ये दाखल केले. आजींची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली व स्कोअर १५ च्या वर होता. त्यामुळे डॉक्टरांसमोर आजींवर उपचार करण्याचे मोठे आव्हान होते. डॉ. सचिन जाधव व डॉ. निखिल गायकवाड यांनी आजींवर उपचार सुरू केले. रेमडेसिविर व ऑक्सिजनविनाच आजींवर उपचार करण्यात आले. कोविड केंद्रातील गणेश आडागळे, अनिल जाधव, आदींनी आजींची सेवा केली.
हंगेश्वर कोविड सेंटरमधून निरोप देताना पार्वती दळवी यांना चिंचेचे झाड भेट देताना स्वयंसेवकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.