अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी (दि. २५) झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषदेच्या सभापती मीरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सीताराम राऊत, रामहरी कातोरे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, यशोधनचे आरोग्य अधिकारी महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह प्रत्येक पदाधिकाऱ्याने यात लक्ष घालावे, नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन तपासणी करावी, तरच आपल्याला रुग्ण शोधता येतील. या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व देणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यासाठी ऑक्सिजन व रेमडेसिविर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु सध्या वाढणारी रुग्णसंख्या कमी करण्याचे मोठे आव्हान आहे.