संगमनेर : कोरोनाची दुसऱ्यांदा लाट आली असून रुग्णसंख्या वाढत आहे. संगमनेर तालुक्यात वाढणारी रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक असून, नागरिकांनी निष्काळजीपणा न करता गर्दी टाळत, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करून स्वत:ची काळजी घ्यावी. म्हणजे आपण व आपला परिवार कोरोनापासून सुरक्षित राहील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरिया, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, मुकुंद देशमुख, डॉ. वसीम शेख, डॉ. सुरेश घोलप, महेश वाव्हळ, आदी उपस्थित होते.