अहमदनगर : मारहाण व दमदाटीप्रकरणी पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासह त्यांच्या दोन भांवाना जिल्हा न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश वी़वी़ बांबर्डे यांनी हा निकाल दिला़पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथे शहा शरीफ बाबा यात्रेत ३ एप्रिल २०१४ रोजी रात्री सलीम रज्जाक शेख व गावातील अशोक शिरसाठ यांच्यात वाद झाला़ या वादातून ४ एप्रिल २०१४ रोजी शेख यांना शिरसाठ बंधुंनी मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी गावातील गोकूळ गाडे व भुजंगराव गाडे यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी गहिनीनाथ शिरसाठ यांनी भुजंगराव गाडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली़ या घटनेचा मनस्ताप सहन न झाल्याने भुजंगराव हे घटनास्थळी चक्कर येऊन पडले़ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी गहिनीनाथ यांच्यासह अशोक जगन्नाथ शिरसाठ व राजेंद्र जगन्नाथ शिरसाठ यांच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याबाबत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले़ आरोपींविरोधात कलम ३२३ व ५०६ अन्वये पुरावा समोर अल्याने न्यायालयाने तिघांना कलम ३२३ प्रमाणे ६ महिने शिक्षा व ५०० रूपये दंड तसेच कलम ५०६ प्रमाणे १ वर्षे शिक्षा व ५०० दंड अशी शिक्षा ठोठावली़ या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ पुष्पा गायके-कापसे यांनी काम पाहिले़
माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठसह दोघांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 3:53 PM