लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : मानवी शरीरात सरासरी सहा लीटर रक्त असते. त्यात शरीराच्या वजनाच्या ६० टक्के म्हणजेच ४.४ लीटर पाण्याचे प्रमाण असते. याचा समतोल राखला गेला तर प्रकृती स्थिर राहते. मात्र, पाण्याचे कमी-अधिक प्रमाण झाल्यास शारीरिक व्याधींचा सामना करावा लागू शकतो. तसेच पाणी जास्त प्रमाणात पिल्यास किडनी विकार नसणाऱ्या रुग्णांमध्ये फारसा त्रास जाणवत नाही. मात्र, ज्यांना विकार आहे, त्यांनी जास्त पाणी पिल्यास तज्ज्ञांच्या मते शरीरासाठी ते अपायकारक ठरू शकते.
मानवी शरीरासाठी रक्ताबरोबरच पाण्याची गरज महत्त्वाची असते. आपल्या देशात उष्णता जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे २४ तासांत सरासरी ५ ते ५.५ लीटर पाण्याची मानवी शरीराला गरज असते. त्यातून प्रकृती स्थिर राहते. मात्र, कामाच्या स्वरूपानुसार पाण्याची मात्रा बदलू शकते. एसीमध्ये बसून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या व्यक्तींनी ४.५ लीटर पाणी पिल्यास शरीराची गरज भागते. कारण, त्यांचे घामाचे प्रमाण कमी असते. याउलट जडकाम किंवा शेतीकाम करणाऱ्या व्यक्तींची पाण्याची मात्रा ही ५.५ ते ६ लीटर असते. कारण, दिवसभरातील कामाच्या माध्यमातून अशा व्यक्तींचा १.५ ते २ लीटर घाम निघतो, त्यातूनच शरीरातील पाण्याची मात्रा कमी होते. अशा व्यक्तींनी २४ तासांत ५ ते ५.५ लीटर पाणी प्यायले पाहिजे.
............
शरीरात पाणी कमी पडले तर...
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास लघवीचे इन्फेक्शन, मूतखडा होणे तसेच अतिसारातून अपचन, आम्लपित्त यासारखे विकार वर डोके काढू शकतात.
................
शरीरात पाणी जास्त झाले तर...
सहा ते सात लीटर पाणी पिल्यास वारंवार लघवीसाठी जावे लागू शकते. तसेच यातून शरीरातील सोडियम यासारखे घटक जास्त प्रमाणात जातात. ज्यांना किडनीचा विकार आहे, अशा व्यक्तींसाठी हे त्रासदायक ठरू शकते. मात्र, ज्यांना विकार नाही, त्यांना फारसा त्रास जाणवत नाही.
.........
कोणी किती प्यावे पाणी?
वयोगट २४ तासांत किती पाणी ( लीटरमध्ये)
नवजात ते १५ वर्षांपर्यंत - ३. ५ ते ४
१६ ते ६१ पेक्षा जास्त वर्षापर्यंत - ५ ते ५.५
............
तज्ज्ञ काय म्हणतात?
आपल्या देशात उष्णता जास्त असल्याने मानवी शरीराची पाण्याची मागणी जास्त असते. परंतु, कामाच्या स्वरूपानुसार पाण्याची मागणीदेखील बदलते. कमी किंवा जास्त कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये २४ तासांत सरासरी ४.५ ते ५.५ इतके पाणी पिणे अपेक्षित असते. तसेच सहा ते सात लीटर पाणी पिल्यास वारंवार लघवीसाठी जावे लागू शकते. तसेच यातून शरीरातील सोडियम यासारखे घटक जास्त प्रमाणात जातात. ज्यांना किडनीचा विकार आहे, अशा व्यक्तींसाठी हे त्रासदायक ठरू शकते. मात्र, ज्यांना विकार नाही, त्यांना फारसा त्रास जाणवत नाही.
- डॉ. निलेश सदावर्ते, युरोलॉजिस्ट, श्रीरामपूर
........
स्टार १२१०