मंडळाचे प्रमुख अशोक उपाध्ये, समितीचे साजिद मिर्झा, अहमद जहागीरदार, सुरेश सोनवणे, विशाल अंभोरे, अशोक बागूल, नागेश सावंत, फिरोज दस्तगीर, विजय शेलार आदी यावेळी उपस्थित होते. शहरातील महावितरणच्या कार्यालयावर वीज बिल माफ करा, अतिरिक्त कर लावू नका, ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना वीज बिले वाढवून आली. सरकारने शंभर युनिट कमी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेचा दिलासा द्यावा, असे उपाध्ये म्हणाले.
संविधान बचाव समितीचे अहमद जहागीरदार यांनी सरकारने गरीब घटकांचे वाढीव बिलामुळे अतोनात हाल झाल्याचे सांगितले.
यावेळी फय्याज कुरेशी, बंडू काळे, संजय खैरे, बापू तुपे, फिरोज पठाण, सुनील डहाळे, शाहीद कुरेशी, नदीम तांबोळी, अब्दुल मणियार, जावेद तांबोळी आदी उपस्थित होते.
----
फोटो ओळी : आंदोलन
महावितरण कंपनीचे अभियंता अमित कांबळे यांना निवेदन देताना अशोक उपाध्ये, अहमद जहागीरदार, सुरेश सोनवणे, साजिद मिर्झा, विशाल अंभोरे, अशोक बागूल, नागेश सावंत आदी.