अहमदनगर : महापालिकेच्या सभेला येण्यासाठी भाजपाचा निलंबित उपमहापौर छिंदमला पोलीस संरक्षण दिल्याने युवा सेनेच्यावतीने या घटनेचा निषेध केला. याबाबत शुक्रवारी सेनेच्यावतीने पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांना निवेदन देऊन छिंदमला नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी केली.निवेदन देतेवेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, मधन आढाव, अभिषेक भोसले, मृणाल भिंगारदिवे, आप्पा नळकांडे, महिला शहरप्रमुख अरुणा गोयल, उषा ओझा, विजय पठारे, सुमित धेंड, निखील होगले, अवधूत फुलसौदर, अक्षय नागापुरे, किरण अगरवाल, प्रशांत गायकवाड, प्रशांत भाले, जय बिडकर आदी उपस्थित होते.छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत़ या घटनेमुळे राज्यात अशांतता निर्माण झाली होती. या छिंदमला पोलीस बंदोबस्तात महापालिकेत प्रवेश देण्यात आला. छिंदमला आठ ते नऊ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी हे निवेदन स्वीकारले.
छिंदमला जिल्ह्यातून हद्दपार करा : शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 10:50 AM