अहमदनगर : रसिकांच्या उपस्थितीत ‘लोकमत उमंग’ अंतर्गत आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप झाला.या प्रदर्शनामुळे अहमदनगरचे सौंदर्य आणि येथील जैव विविधतेचे महत्त्व अनुभवायला मिळाले, अशी प्रतिक्रिया रसिकांनी दिली व छायाचित्र खरेदीतून ‘लोकमत’च्या सामाजिक उपक्रमाला हातभार लावला.जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून ‘लोकमत उमंग’ अंतर्गत समर्थ डिजीटल लॅब प्रायोजित आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत जिल्ह्यातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांनी अतिशय सुंदर अशी छायाचित्रे पाठविली होती. या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन ओम गार्डन येथे भरविण्यात आले होते.या छायाचित्रांच्या माध्यमातून रसिकांना ग्रामीण जीवनशैली, प्राणी, पक्षी, विशाल गणपती, चाँदबिबी महाल, पक्ष्यांचे घरटे, कावळ्यांच्या घरट्यांत विसावलेली कोकीळ, डोंगराळ भागातून वाहणारे लहान-मोठे धबधबे, वनराई, पाऊलवाट, शेतकऱ्यांनी फुलविलेली शेती, ऊन-पावसाचा खेळ, मावळतीला आलेल्या सूर्याची धरणीवर पसरलेली लाल किरणे, धुके अशा निसर्गाच्या आणि जैव विविधतेच्या छटा पहायला मिळाल्या.दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी रसिकांनी छायाचित्रे खरेदी करून ‘लोकमत’च्या सामाजिक कार्याला हातभार लावला. तसेच ‘लोकमत’चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, यापुढेही हे कार्य असे सुरू राहावे अशा शुभेच्छा दिल्या.छायाचित्र विक्रीतून मिळालेली रक्कम स्नेहालय या संस्थेस देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)स्पर्धेचा निकालप्रथम- संजय दळवी, द्वितीय- सुधीर भालेराव, तृतीय- नितीन केदारी, उत्तेजनार्थ- जितेंद्र अग्रवाल, ओंकार गिते.
अहमदनगरचे सौंदर्य अनुभवले
By admin | Published: August 29, 2014 11:31 PM