आमदार विखे यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी आणि आयोगाच्या सर्व्हरमध्ये सातत्याने येत असलेल्या व्यत्ययाबाबतची वस्तूस्थिती निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती. अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची आणि ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यातच मागील आठवड्यात तीन दिवस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही इच्छुक उमेदवारांना शासकीय कार्यालयातून वेळेत मिळाली नाही.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असलेल्या या अडचणी गृहित धरून ऑफलाइन अर्ज दाखल करून घेण्याबाबत आयोगाने विचार करून मुदतवाढही द्यावी, अशी विखे यांनी केलेली मागणी मान्य झाल्याने इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयोगाच्या नव्या निर्णयामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी (दि.३०)रोजी ऑफलाइन पद्धतीने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची मुदत राज्य निवडणूक आयोगाने दिली असल्याचे परिपत्रक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी काढले आहे.