अहमदनगर : शिक्षक हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे़ ११ मार्चपर्यंत प्रवेशाची मुदत होती़ मात्र, आता ३० मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली़जिल्ह्यातील विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावरील शाळांमधील पहिलीच्या प्रवेशाच्या २५ टक्के जागा आरटीईनुसार मागासवर्गीय, तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात़ या जागांवर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे़ आरटीईनुसार प्रवेशास पात्र असलेल्या शाळांमध्ये उपलब्ध जागांची नोंदणी व त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया ८ ते २२ फेबु्रवारी या कालावधीमध्ये पार पडली. त्यानंतर आॅनलाईनपद्धतीने अर्ज करण्यासाठी २५ फेबु्रवारी ते ११ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती़ मात्र, आता ही मुदत वाढवून ३० मार्चपर्यंत करण्यात आली आहे़तालुकानिहाय आलेले अर्जच्अकोले - २३१, जामखेड- २२, कोपरगाव- ३४३, कर्जत - ११०, नगर - ५५१, नेवासा - ३८३, पारनेर - २२१, राहुरी - २३२, राहाता - ४३४, शेवगाव - १७०, संगमनेर - ४७४, श्रीगोंदा - १०५, श्रीरामपूर - ४२८, नगर महापालिका शाळा - ७९३़साडेतीन हजार जागा राखीवच्जिल्ह्यातील ४०० शाळांमधून आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ या शाळांमधील ३ हजार ६०६ जागा राखीव असून, त्यापैकी पूर्वप्राथमिक वर्गाच्या २१ आणि प्राथमिकच्या इयत्ता पहिली वर्गाच्या ३ हजार ५८५ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत़ या राखीव जागांसाठी ४ हजार ७१८ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले़
आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशाला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 6:19 PM