शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

कोरोना विषाणूचा करण्या संहार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:22 AM

पारनेर-नगर मतदारसंघाची भूमी ही शुरांची, वीरांची, त्यागी समाज सुधारकांची, साधू संतांची भूमी. या भूमीने देशाला अनेक नामवंत हिरे दिले ...

पारनेर-नगर मतदारसंघाची भूमी ही शुरांची, वीरांची, त्यागी समाज सुधारकांची, साधू संतांची भूमी. या भूमीने देशाला अनेक नामवंत हिरे दिले आहे. बहिर्जी नाईक, सेनापती बापट, संत निळोबाराय महाराज तसेच या मतदारसंघातील पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार हे या मतदारसंघातील भूमिपुत्र व त्यांच्या कर्तृत्वाची ओळख सातासमुद्रापलीकडे पोहोचवणारी पारनेर नगरची माती.

देशाचे राजकारण व समाजकारण करत देशाला नवी दिशा देणारे व तळागाळातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींची गुणवत्ता ओळखण्यात माहीर असणारे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार या जवाहीराने नीलेश लंके नावाच्या मौल्यवान हिऱ्याची पारख केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून नीलेश लंके यांच्यावर विश्वास टाकला व त्या विश्वासाच्या बळावर एका सामान्य शिक्षकाच्या मुलाला पारनेर-नगर मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक मताधिक्क्याने जनतेने निवडून दिले. सर्वसामान्य जनतेच्या हृदयआसनावर जनतेने आपला जननायक म्हणून त्या सामान्य व्यक्तीला लोकनेता ही पदवी बहाल केली.

कोरोना विषाणूचा जैविक विळखा संपूर्ण जगाला बसला असून या जैविक युद्धात एक योद्धा बनवून आपल्या जिवाची पर्वा न करता प्रशासन व सामान्य जनता यातील दुवा बनवून एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे वास्तववादी चित्र महाराष्ट्रातील तमाम जनतेला प्रत्यक्षदर्शी अनुभवयास मिळाले.

कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हापासून प्रशासकीय नियमांचे पालन करत पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर आमदार लंके पोहोचले. कोरोनाच्या कठीण काळात एक योद्धा बनवून स्वतःच्या पाठीवर निर्जंतुकीकरणाचे पंप घेत व स्वतः फवारणी करताना लंके यांना महाराष्ट्राने पाहिले आहे.

स्वतःला समाजसेवक, नेते समजणारे अनेकजण कोरोनाच्या भीतीपोटी घराबाहेर पडायला तयार नव्हते. असे असताना हा योद्धा आपल्या आरोग्याची पर्वा न करता स्वतः रस्त्यावर उतरला. त्यांच्या आरोग्याबद्दल अनेक माता-भगिनींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले व आमदार लंके यांना तब्येतीची काळजी घेण्याचे सल्लेही दिले. परंतु माझी माय-बाप जनता अडचणीत असताना मी स्वस्थ बसू शकत नाही असे सांगत दिवसातील १८ ते २० तास जनसेवेत आमदार लंके होते.

लॉकडाऊनमुळे अनेक कमवते हात निष्क्रिय झाले. मजूर, कामगार, विद्यार्थी यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशावेळी आमदार लंके हे रस्त्यावर उतरले. लोकांच्या जेवणाची व्यवस्था करू लागले. ते पाहून त्यांचे मित्र, कार्यकर्तेही मदतीला आले. भाजीपाला, किराणा, फळे वाटप करू लागले. सुपा येथे ३० मार्चपासून २०२० पासून आनंदी थाळी नावाने अन्नछत्र सुरू केले.

या अन्नछत्राच्या माध्यमातून माझा, परका हा भेदभाव न करता समाजकारण विरहित राजकारण करण्याचा मानस ठेवून सुपा चौकात रस्त्याने जाणारे वाटसरू, मालवाहतूक ड्रायव्हर, मजूर बांधव यांना हक्काने आपला बांधव म्हणून थांबवून घेत त्यांची आपुलकीने चौकशी करत त्यांना पिण्याचे पाणी, अनवाणी पायाने उन्हातून चालणारे त्यांचे छोटे छोटे मुले त्यांना चप्पल, बिस्कीटचे वाटप, मास्क, अत्यावश्यक औषधांचे स्टॉल लावून त्यांना सेवा पुरवण्यात आली.

अन्नछत्राच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या मदतीने नगर व पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुरूची भोजन पोहोचविण्याचे पवित्र काम सुरु केले. दिवसभरात किमान चार ते पाच हजार लोकांना अन्न घरपोच पोहोचविण्याचे कार्य लंके यांनी केले. या अन्नछत्रात अनेकांनी आपापल्या परीने योगदान दिले. एव्हढ्यावरच हा कोरोना योद्धा थांबला नाही तर पारनेर-नगर मतदारसंघातील भूमिपुत्र असणारे व नोकरी-व्यवसायासाठी इतर जिल्ह्यात गेलेल्या बांधवांना गावी येण्यासाठी मदतकार्य उभारले. अधिकाऱ्यांच्या मदतीने भूमिपुत्र विलगीकरण केंद्र चालू करत, त्यांना अन्नदानासह सर्व मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या.

या अन्नछत्राबरोबरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, परिवहनमंत्री, महसूलमंत्री यांसह सर्व संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी यांच्या सल्ल्याने मतदारसंघात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित केली. सर्व आरोग्य केंद्राला भेट देत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय साधत वाडी-वस्तीवर सक्षम आरोग्य सेवा पुरविण्यात आमदार लंके यशस्वी झाले.

शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक परजिल्हा, परप्रांतीय शेतमजूर विद्यार्थी बांधवांना आपल्या घराची ओढ लागली होती. आपल्या गावी जाण्यासाठी कुठलीही वाहन व्यवस्था नव्हती. दोन महिने रोजगार नसल्याने खिशात पैसे नव्हते. यामुळे मेटाकुटीला आलेला परजिल्ह्यातील बांधव व परप्रांतीय हतबल झाले होते. त्यांना आमदार लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयात ते गर्दी करत होते. जणू ते त्यांचे आधार केंद्रच बनले होते. आमदार लंके व त्यांचे सहकारी सामाजिक जाणिवेतून त्यांना आधार देत होते.

इंदोर येथील हर्षवर्धन नावाचा एक परप्रांतीय बांधव आपल्या या दोन छोट्या मुलांसह आपल्या कुटुंबासमवेत उपाशीपोटी पायी आपल्या गावी निघाला होता. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी, वृद्ध वडील हेही अनवाणी पायाने चालताना पाहून हा कनवाळू योद्धा गाडीतून उतरला. त्यांच्याजवळ गेला व त्यांची चौकशी केली. त्यांचे हृदयद्रावक वास्तव ऐकून या कनवाळू जननायकाचे डोळे पाणावले. त्यांनी या हर्षवर्धन व त्याच्या कुटुंबाला सुपा या ठिकाणी थांबवून घेतले. त्यांच्या छोट्या मुलांना दुध, कुटुंबाला कपडे, पांघरण्यासाठी सतरंजी, चप्पल देत त्यांची राहण्याची व्यवस्था केली. दोन दिवस थांबून त्या कुटुंबाची इंदूर येथे जाण्याची व्यवस्था केली. हा कोणी मतदार नव्हता की नातेवाईक नव्हता. परंतु त्याला त्याच्या गावी पोहोचेपर्यंत या जननायकाने जेवनही केले नाही. हे अनेकांनी प्रत्यक्षदर्शी अनुभवले आहे.

परजिल्ह्यातील व परप्रांतातील बांधवांना पोहोचविण्यासाठी शासन निर्णय झाला. दोन महिने बंद पडलेली परिवहन मंडळाची लालपरी महाराष्ट्रात प्रथमच पारनेर आगारातून धावली. ज्यावेळेस रेल्वेची व्यवस्था झाली, तेव्हा प्रशासनाच्या मदतीने व आपल्या सहकाऱ्यांनी सर्व वैद्यकीय तपासणी केली. तसेच कपडे, चप्पल, जेवण पुरवित स्वतः बस चालवत त्यांना नगर रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचविणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणून नीलेश लंके यांचे नाव घेतले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या सहकारी मित्रांनी या लोकनेत्याला सावलीसारखी साथ दिली.

निघोज येथे उपाशीपोटी झोपलेल्या अनेक कुटुंबांना विलगीकरण कक्षात रात्री अडीच वाजता जेवण पोहोच केले. एका भगिनीची विलगीकरण कक्षात प्रसूती झाली असता प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना आपल्या माहेरच्या मायेची उणीव भासू न देता आपली भगिनी म्हणून त्या महिलेची व बाळाची काळजी घेणारा असा लोकनेता विरळच. म्हणूनच मतदारसंघातील तमाम जनतेला या कोरोना योद्ध्याबद्दल अभिमान वाटतो !

-श्रीकांत चौरे