शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

सामान्यांना आरोग्य सुविधा न मिळणे सरकारचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:20 AM

कोरडगाव : राज्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. अनेक ठिकाणी औषधांचा काळा बाजार ...

कोरडगाव : राज्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. अनेक ठिकाणी औषधांचा काळा बाजार भरलेले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रुग्ण मृत्युमुखी पडत असताना सरकारला राजकारणापलिकडे काही दिसत नाही. विरोधी पक्षाने टीका करण्याऐवजी सरकारच विरोधी पक्षावर टीका करत असतानाची महाराष्ट्राच्या राजकारणातील ही पहिलीच वेळ आहे, अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी राज्य सरकारवर केली.

आगसखांड, (ता.पाथर्डी) येथे पंचायत समिती सभापती सुनीता दौंड व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या ३०० बेडच्या स्व. गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी त्या बाेलत होत्या.

प्रांताधिकारी देवदत्त केकाण, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, आदिनाथ महाराज शास्त्री, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, मेजर बालाजी पोंधे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, अमोल गर्जे, खरेदी -विक्रीचे संचालक बंडू बोरुडे, वृद्धेश्वरचे संचालक बाळासाहेब गोल्हार, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, विष्णूपंत अकोलकर, रणजित बेळगे, नारायणराव काकडे, अकोलेचे उपसरपंच अर्जुन धायतडक आदी उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली. रुग्णसंख्या वाढल्याने हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, ऑक्सिजन, रेमडेसिविर औषधाचा काळा बाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी रुग्णांची लूट अशा अडचणी निर्माण झाल्याने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अवाजवी बिले आकारली जात आहेत. शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर औषध देण्यासाठी पात्रताधारक वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत. कोराेना लसी मिळत नाही, असे गंभीर प्रकार रोज घडताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील अनेक धर्मादाय संस्थांनी पुढाकार घेऊन कोविड केअर सेंटर केले आहेत.

---

दोन महिने पालकमंत्री फिरकतच नाहीत..

जिल्ह्याला दोन मंत्रीपदे आहेत. ते मंत्री फारसे जिल्ह्यात सक्रिय दिसत नाहीत. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ हेही दोन महिन्यातून एखाद्यावेळी जिल्ह्यात येतात. त्यांना जनतेचे देणे-घेणे नाही. पालकत्व स्वीकारून पालकमंत्री काम करत नसतील तर जनतेने काय करावे, असा सवाल अरुण मुंडे यांनी केला.

--

२१ पाथर्डी कोविड

आगसखांड (ता.पाथर्डी) येथे स्व. गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, गोकुळ दौंड, अरुण मुंडे व इतर.