शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आई-वडिलांच्या कष्टाला हुरूप देणारा ‘विश्वास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 2:54 PM

बोधेगाव (ता. शेवगाव) येथील रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ९३.३८ टक्के गुण मिळवून यशाची उत्तुंग भरारी घेतली. घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून त्याने मिळवलेले हे यश आई-वडिलांच्या कष्टाला हुरूप देणारे ठरले आहे.

संजय सुपेकर । 

बोधेगाव : बोधेगाव (ता. शेवगाव) येथील रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ९३.३८ टक्के गुण मिळवून यशाची उत्तुंग भरारी घेतली. घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून त्याने मिळवलेले हे यश आई-वडिलांच्या कष्टाला हुरूप देणारे ठरले आहे.

बोधेगाव येथील रिक्षाचालक संदीप गलधर व मोलमजुरी करणाºया सुरेखा गलधर या दाम्पत्याचा मुलगा विश्वास याने बारावीला विज्ञान शाखेत ९३.३८ टक्के गुण प्राप्त केले आहेत. हे कुटुंब मुळचे गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथील आहे. रिक्षाचालक संदीप गलधर २०१२ पासून बोधेगाव ते चकलांबा फाटा या मार्गावर रिक्षातून प्रवासी वाहतूक करतात.

 मोलमजुरी व रिक्षा चालवून कुटुंबाची गुजराण करणाºया या अल्पशिक्षित दाम्पत्याने मुलाच्या शिक्षणासाठी अक्षरश: जीवाचे रान केले. दर्जेदार शिक्षणासाठी त्यांनी विश्वासचे पहिली ते बारावीपर्यंतचे बहुतांश शिक्षण घरापासून दूर ठेवूनच  पूर्ण केले. २०१८ ला दहावीमध्ये बोधेगावात तो ९५ टक्के गुण मिळवून प्रथम आला होता. 

अभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रम घेत त्याने शेवगाव येथील न्यू आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात बारावीलाही प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशस्वी वाटचालीत त्यास   प्राचार्य डॉ. पी. आर. कुंदे, उपप्राचार्य डॉ. विजयकुमार बानदार, वर्गशिक्षिका प्रा. एस. झेड. कर्नुलकर, प्रा. संगीता घोरपडे, प्रा. सुधीर काटकर, वाजिद इनामदार, अजहर पठाण, महेश मोरे, सर्जेराव तानवडे आदींचे मार्गदर्शन लाभले. 

या यशामध्ये आई-वडिलांचे कष्ट व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. पुढे जेईईच्या माध्यमातून इंजिनिअरिंग करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे. तसेच यूपीएससीची तयारी करून जिल्हाधिकारी बनून समाजाची सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे, विद्यार्थी विश्वास गलधर याने सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र