शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पडताळणीविना दिली दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 07:44 IST

Ahilyanagar: पूजा खेडकर प्रकरणानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण चर्चेत असून, आता आणखी नवा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

- सुधीर लंकेअहिल्यानगर - पूजा खेडकर प्रकरणानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण चर्चेत असून, आता आणखी नवा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्रणालीच्या युजर आयडी व पासवर्डचा निष्काळजीपणाने वापर केला. रुग्णालयातील तीन सदस्यीय समितीने दिव्यांगांची पडताळणी न करताच प्रमाणपत्र दिली. त्यामुळे दिव्यांगाची बनावट प्रमाणपत्र वितरित झाल्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष नाशिक येथील आरोग्य उपसंचालकांनी नियुक्त केेलेल्या चौकशी समितीने नोंदवला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात आजवर वितरित झालेली ही प्रमाणपत्र कायदेशीर व खरी आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अहिल्यानगरचे मावळते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घाेगरे यांच्या कार्यकाळात ही चौकशी झाली.

एकत्रित तपासणी नाहीचप्रमाणपत्रासाठी विशेषज्ज्ञांच्या नावे आदेशच काढले नाहीत. दिव्यांग विभाग प्रमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिव्यांग व्यक्तीच्या पेपरची पडताळणी प्रमाणपत्र बनवावे लागते.  

गोपनीय आयडी, पासवर्ड कसे झाले उघड? ‘लोकमत’ने १ ऑगस्ट २०२४ रोजी ‘जिल्हा रुग्णालयात नोंद नाही, तरीही ऑनलाईन झळकली प्रमाणपत्र’ हे वृत्त प्रकाशित करून जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. या वृत्तामुळे आरोग्य उपसंचालकांनी सहायक संचालक डॉ. योगेश चित्ते यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. 

या समितीने जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे जबाब घेत अहवाल दिला. दिव्यांग प्रमाणपत्र केवळ ऑनलाईन प्रणालीद्वारे संबंधितांना दिले जाते. या प्रणालीवर माहिती भरण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ असतो. ही गोपनीय बाब आहे. रुग्णालय हा आयडी, पासवर्ड कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करत होते. त्यामुळे त्याचा गैरवापर होऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनली असण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष समितीने दिला आहे.

टॅग्स :Divyangदिव्यांगAhilyanagarअहिल्यानगर